नेताजी शिक्षण संस्थेच्यावतीने तपोरत्नं योगीराजेंद्र महास्वामीजींच्या पादुकांची मिरवणूक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी तपोरत्नं पादुकांची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
प्रथम सकाळी ७.०० नेताजी संस्थेच्या अशोक चौकातील कार्यालयात 'श्री'च्या पादुकांचे विधिवत सहस्रबिल्वार्चन व महाभिषेक पूजा केल्यानंतर आकाशवाणी रोडवरील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलापर्यंत 'श्री'च्या पादुकांचे पालखी व महास्वामीजींच्या प्रतिमेचे सवाद्य मिरवणुक निघणार आहे. मिरवणूक अशोक चौक - ७० फुट - जुना कुंभारी नाका- आकाशवाणी केंद्र- निलम नगर मार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल पर्यंत जाऊन ११.०० वाजता सांगता होणार आहे.
या मिरवणुकीत नेताजी सुभाषचंद्र बोस बालक मंदिर प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम, माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसेच राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी अश्वारूढ व बग्गीतील सजीव देखाव्यासह विविध कलागुणांचा लेझीम, झांज, टिपरी, ढोल, झेंडा नृत्य सादर करणार आहेत. सदभक्तांच्या दर्शनासाठी पादुका दिवसभर ठेवण्यात येणार आहे तरी सदभक्तांनी गुरुपादुकांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा. भावीक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सांयकाळी ६.०० बक्षीस वितरण व भावभक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. रात्रो १०.०५ वाजता आत्मज्योतीचे दिपप्रज्वलन व श्रद्धांजली समर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदभक्तांनी श्रीगुरुच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी केले आहे.
0 Comments