तपोरत्नं पुण्यस्मरण; नेताजी शिक्षण संस्थेत ४०२ जणांचा रक्तदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 12, 2024

तपोरत्नं पुण्यस्मरण; नेताजी शिक्षण संस्थेत ४०२ जणांचा रक्तदान

 तपोरत्नं पुण्यस्मरण; नेताजी शिक्षण संस्थेत ४०२ जणांचा रक्तदान




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष.ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संस्थेत आयोजित रक्तदान शिबिरात ४०२ रक्तदात्यानी रक्तदान करुन श्रद्धांजली अर्पण केले.निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात २१७ जणांनी तर विनायक नगर येथील राजराजेश्वरी शिक्षण संकुलात १८५ जणांनी रक्तदान केले.
निलम नगर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळा, इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ वाय.एच.पाल्लोलू  यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राचार्य विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार, अक्षय ब्लड बँकेचे संचालक अजय रुपनर, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदानासाठी पालकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले. संस्थेच्यावतीने सर्व रक्तदात्यांना भेट वस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर षडाक्षरी हिरेमठ यांनी आभार मानले. अक्षय ब्लड बँकेने रक्त संकलन केले.
विनायक नगर येथे राजराजेश्वरी प्राथमिक शाळा व माध्यमिक प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशुले, धर्मराज बळ्ळारी, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन शितल पाटील यांनी केले.अश्विनी ब्लड बँकेने रक्त संकलन केले.शिबीर यशस्वी होण्यासाठी दोन्ही शिक्षण संकुलातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
सर्व रक्तदात्यांनी पूज्य महास्वामीजींच्या चरणी सेवा रुजू केल्याने संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages