विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या युनिट 1 व 2 वजनकाट्यांची भरारी पथकाकडून तपासणी
दोन्ही ठिकाणचे वजनकाटे अचूक असल्याचे निष्पन्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर-1 व पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील युनिट नंबर -2 येथील वजनकाट्यांची वैधमापन विभागाच्या भरारी पथकाच्या अधिका-यानी अचानक तपासणी केली असता दोन्ही साखर कारखान्याचे सर्व ऊस वजनकाटे योग्य व अचूक असल्याचे निष्पन्न झाले असून कारखान्याकडे गाळपास आलेल्या ऊसाचे वजन वजनकाट्यावर झाल्यानंतर लगेचच संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या मोबाईलवर ऊसाचे वजनाचा तातडीने मेसेज जात असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष माजी आ.बबनराव शिंदे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2024-25 चा ऊस गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. वैधमापनशास्त्र विभागाकडील शेजवळ,निरीक्षक वैधमापन शास्त्र(वजनमापे),वाघोली विभाग,जि.पुणे व यादव, निरिक्षक वैधमापन शास्त्र,पुणे विभाग क्र.2 यांचे भरारी पथकाने दि.05/12/2024 रोजी दुपारी 1 वा.चे सुमारास अचानक विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे पिंपळनेर युनिटला भेट देवून ऊस वजनकाट्यांची तपासणी केली.तसेच या पथकाने ऊस उत्पादकांचे ऊसाने भरलेल्या वाहनाचे कारखान्याचे ऊस वजन काट्यावर वजन केले असता कारखान्याचे वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नसून वजनकाटे योग्य व अचूक असल्याचे सिध्द झाले आहे. यावेळी वैधमापनशास्त्र विभागाचे पथकाने सर्वांचे समोर पंचनामा करून सर्व ऊस वजन काटे बरोबर असल्याचे अहवालात नमुद केले आहे.
तसेच उपनियंत्रक वैधमापनशास्त्र (वजनमापे) पुणे येथील ए.वाय.अभंगे, उपनियंत्रक, वैधमापनशास्त्र पुणे जिल्हा क्र.4, निरिक्षक वैधमापनशास्त्र पुणे क्र.5, निरिक्षक वैधमापन शास्त्र इंदापूर विभाग व निरिक्षक वैधमापन शास्त्र खेड विभाग प्र.रा. बागडे यांचे भरारी पथकाने दि.10/12/2024 रोजी सांयकाळी 5 वा. चे सुमारास अचानक विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे करकंब युनिटला भेट देवून ऊस वजनकाट्यांची तपासणी केली.तसेच या पथकाने ऊस उत्पादकांचे ऊसाने भरलेल्या वाहनाचे कारखान्याचे ऊस वजन काट्यावर वजन केले असता कारखान्याचे वजन काट्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नसून वजनकाटे योग्य व अचूक असल्याचे सिध्द झाले आहे. यावेळी वैधमापनशास्त्र विभागाचे पथकाने सर्वांचे समोर पंचनामा करून सर्व ऊस वजन काटे बरोबर असल्याचे अहवालात नमुद केले आहे.
सदरप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर सुहास यादव, केन मॅनेजर संभाजी थिटे, इन्स्टुमेंट इंजिनिअर अजित माने, केनयार्ड सुपरवायझर नामदेव गायकवाड, युनिट नं.2 चे शेती अधिकारी रामचंद्र पाटील,बाबुराव इंगवले, इन्स्टुमेंट इंजिनिअर अतुल देंबरे, ऊस पुरवठा अधिकारी गणेश खेडेकर, केनयार्ड सुपरवायझर महादेव गायकवाड, ऊस पुरवठादार शेतकरी, वाहनमालक,ट्रॅक्टर ड्रायव्हर, बैलगाडीवान उपस्थित होते.
0 Comments