Hot Posts

6/recent/ticker-posts

निमगाव येथे शुक्रवारी आंबा उत्पादकांसाठी कार्यशाळा

 निमगाव येथे शुक्रवारी आंबा उत्पादकांसाठी कार्यशाळा




निमगाव (कटूसत्य वृत्त):- निमगाव ता माळशिरस येथे आंबा उत्पादकांसाठी शुक्रवार दि 13 डिसेंबर 2024 रोजी निमगाव पिलीव रोड येथे निनाद पाटील यांच्या केशर आंबा बागेत आंबा उत्पादकांसाठी कार्यशाळा आयोजित केली असल्याची माहिती महादेश फार्मस फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सचिन नलावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली


    यावेळी बोलताना नलावडे म्हणाले की, माळशिरस तालुका कृषी विभाग व महादेश फार्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सोलापूर आत्मा अंतर्गत आंबा उत्पादकांसाठी कार्यशाळा आयोजित केली असून या कार्यशाळेसाठी तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, कृशिभूषण आंबा उत्पादक शेतकरी डॉ. केशव सरगर, प्रभारी मंडळ अधिकारी सुरेश देवकाते, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा ,माळशिरस कुलदीप ढेकळे हे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असून यामध्ये फळबाग लागवडीसाठी शासनाच्या विविध योजना, अतिसघन आंबा लागवड, आंबा लागवडीपासून छाटणी, विरळणी आणि जोपासना, आंबा संगोपन चतुसूत्री, मोहर संरक्षण आणि खत व्यवस्थापन, आंबा काढणे ते पिकविण्यासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ,आंबा विक्री व्यवस्थापन प्रश्न उत्तरे आणि समाधान आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे

   माळशिरस तालुक्यात दिवसेंदिवस आंबा लागवडीचे क्षेत्र वाढत असून शास्त्रोक्त पद्धतीने जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तालुक्यासह आसपासच्या गावातील जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सदर आंबा कार्यशाळेत उपस्थित राहावे असे आवाहन महादेश फार्मस फाउंडेशन व तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे .
Reactions

Post a Comment

0 Comments