कर्मचारी संघटनेचे आ. बाबासाहेब देशमुख यांना निवेदन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सांगोला विधानसभेचे आमदार बाबासाहेब देशमुख जिल्हा परिषदे मध्ये आले असता कर्मचारी संघटनेने त्यांचे स्वागत केले व कोव्हिड १९ संसर्ग आजारामुळे मृत्यु झालेल्यांना अद्याप पर्यत शासनाकडून विमा कवच ची रक्कम मिळली नाही. सदरची रक्कम शासनाकडूून वारसास' त्वरित मिळणेबाबत पाठपुरावा करावा याबाबत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी निवेदन दिले. याप्रसंगी सचिन मायनाळ, भाऊसाहेब चोरमले, दिनेश बनसोडे, रणजीत घोडके, संतोष जाधव, सचिन घोडके, दादा कटरे, रवि करजगी आदि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments