Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेना ठाकरे पक्षाकडून कागदी विमाने उडवून भाजपचा निषेध

 शिवसेना ठाकरे पक्षाकडून कागदी विमाने उडवून भाजपचा निषेध




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे येथील सिध्देश्वर साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मितीची
चिमणी विमानसेवेला अडसर ठरत असल्याचे कारण दाखवून चिमणी भाजपने पाडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे लोकार्पण होऊनही विमानसेवा सुरू होत नसल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी कागदी विमान उडवून भाजप सरकारचा अनोखा पध्दतीने निषेध नोंदविला. सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडून एक वर्ष उलटले तरी विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. विधानसभेच्या तोंडावर २३ डिसेंबरला विमानसेवा सुरू होणार, १० डिसेंबरपासून बुकिंग होणार, अशा पुड्या भाजपकडून सोडण्यात आल्या. परंतु प्रत्यक्षात काहीही घडले नाही. सोलापूरच्या औद्योगिक, वैद्यकीय, शैक्षणिक विकासासाठी नागरी विमानसेवा महत्त्वाची आहे. परंतु, विमानसेवेसाठी विमानतळ सज्ज असल्याने पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अलीकडे उदघाटन करून विमानतळाचे लोकार्पणही झाले. तरीही विमानसेवा सुरू होत नसल्याने दोष कोणाला द्यायचा, असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेने हे आंदोलन केले.शिवसेनेचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर आणि जिल्हा उपप्रमुख प्रताप चव्हाण
यांच्या नेतृत्वाखाली उपरोधिक आंदोलन करून कागदी विमाने विमानतळाच्या प्रवेशद्वारावर
उडविण्यात आली. फुग्यांना कागदी विमाने बांधून फुगा पंतप्रधानांकडे पाठवून दिला.
पंतप्रधान विश्वगुरू असल्यामुळे शिवसेनेने पाठवलेला संदेश त्यांना नक्कीच मिळेल. ज्याप्रमाणे नल दमयंतींचा संदेश मेघ नेऊन देत असे, तसेच हा फुगा देखील पंतप्रधानांना सोलापूरकरांचा संदेश पोहोचवेल. असा विश्वास याप्रसंगी धाराशिवकर यांनी व्यक्त केला. या पत्राची दखल घेऊन पंतप्रधान मोदी सोलापूरची विमानसेवा सुरू करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.या आंदोलनाच्यावेळी विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपशहर प्रमुख,लहू गायकवाड, सुरेश जगताप,संदीप बेळमकर, दत्ता खलाटे,जर्गीस मुल्ला, रेवण बुक्कानुरे,उज्ज्वल दीक्षित, शशिकांत बिराजदार, अजय खांडेकर, शिवा ढोकळे, गणेश कुलकर्णी, मनोज कामेगावकर, प्रकाश काशीद, आदी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments