Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यातील गुटखाबंदी कागदोपत्रीच

सोलापूर जिल्ह्यातील गुटखाबंदी कागदोपत्रीच




कुरूल (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात गुटखाबंदी असली तरी शेजारच्या कर्नाटक
राज्यातून बेकायदेशीररीत्या गुटखा आणून त्याची सर्रास विक्री केली जात आहे. याकडे अन्न व
औषध प्रशासन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. गुटखाबंदी

केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे.सुगंधित तंबाखूयुक्त मावा सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे.इतकेच नव्हे तर आता शासकीय कार्यालयात काही जण तोंडात गुटखा चघळतात.दरम्यान, अन्न व औषध यावर संबंधित खात्यांचे प्रशासन किंवा पोलिसांनी कसलेच नियंत्रण नाही. मोहोळ सापळा लावून गुटखा पकडावा, तालुक्यातील सर्वच गावांत,अशी मागणी नागरिकांतून पानटपऱ्यात, किराणा दुकानात केली जात आहे. गुटखा आणि राजरोसपणे गुटखा विकत मिळतो.मावा चघळण्याकडे तरुणाईचा दरम्यान, शेजारील कर्नाटक कल वाढत आहे. आरोग्यास राज्यातून विविध वाहनांद्वारे हानिकारक असलेला गुटखा, मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.विजयपूर - मंद्रूप या मार्गावरून दुचाकीवर अथवा मोटार, गाडी,जीप अशा वाहनांच्या माध्यमातून गुटखा विक्रीसाठी येत आहे.संबंधित वाहनात काय आहे,याची संबंधित पथकामार्फत दररोज तपासणी होणे गरजेचे आहे.गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याने सदर वाहनांची पोलिसांनी तपासणी करणे आवश्यक आहे. सध्या विमल पानमसाला, सुगंधी तंबाखू, आरएमडी पानमसाला, एम. सुगंधी तंबाखू, एस.पी. ९९९ सुगंधी आदींची बेकायदेशीररीत्या विक्री केली जात आहे. वास्तविक राज्यात गुटखा विक्री व साठा करण्यास बंदी आहे. तरीही मोहोळ शहर व ग्रामीण भागात अनेक हॉटेल आणि पानटपऱ्यांवर खुलेआम गुटख्याची विक्री सुरु आहे. या गंभीर बाबीकडे संबंधित अधिकाऱ्यांची डोळेझाक होत असल्याने ही गुटखाबंदीची मोहीम अपयशी ठरत आहे.राज्याचे माजी गृहमंत्री स्व.आर. आर. पाटील यांनी राज्यात गुटखाबंदीची घोषणा केली होती. वास्तविक गुटख्याच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर  विपरीत परिणाम होतो, कॅन्सरचा धोका वाढतो, भूक कमी होते.याची गांभीर्याने दखल घेऊन गुटखाबंदीची अंमलबजावणी सुरू झाली होती. मात्र, सध्या छुप्या मार्गाने आणून गुटख्याची विक्री केली जात आहे.  

Reactions

Post a Comment

0 Comments