पाच ठिकाणी महापालिकेची अतिक्रमण मोहीम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात महापालिकेच्या वतीने स्वच्छतामोहीम घेतली जात असताना दुसरीकडे अतिक्रमण विभागाच्या वतीने रस्त्यांच्याकडेला चौकात झालेले अतिक्रमण काढण्यावर भर दिला जात आहे. मंगळवारी (दि. ३) सात रस्ता, भैय्या चौक, कंबर तलाव, चैतन्य भाजी मार्केट परिसरात मोहीम घेऊन बेकायदा अतिक्रमण काढण्यात आले.
पार्क चौक ते भैया चौक रस्त्यावरील व फुटपाथवरील असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या काढण्यात आल्या. या मोहिमेत पाच लोखंडी खोके व दोन हातगाड्या, इतर सामान जप्त करण्यात आले. दुपारच्या सत्रात कंबर तलाव ते अशोकनगर तसेच चैतन्य मार्केटसमोरील
रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यात आले. तीन लोखंडी खोके, हातगाडी व स्पिकर जप्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुपर मार्केटसमोर असलेली बेकायदा खोकी जेसबीच्या सहाय्याने काढली. महापालिका आयुक्तांच्या आदेशाने अतिक्रमण विभागप्रमुख हेमंत डोंगरे, मुर्तज शहापुरे, तुफियान पठाण यांनी ही मोहीम पोलिस बंदोबस्तात यशस्वी केली.
0 Comments