Hot Posts

6/recent/ticker-posts

पांडुरंग कारखान्याच्या १,२१,१११ व्या साखर पोत्याचे पोत्याचे पूजन

 पांडुरंग कारखान्याच्या १,२१,१११ व्या साखर पोत्याचे पोत्याचे पूजन




श्रीपूर(कटूसत्य वृत्त):- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये उत्पादित झालेल्या १,२१,१११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत व संचालक सुदाम बापू मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रशांत परिचारक म्हणाले की, कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ हा  सुरळीत सुरू आहे. कारखाना नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आहे. गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसास चांगला दर देणार आहे. प्रति दिन सरासरी ८५०० मे. टनाप्रमाणे ऊस गाळप करीत आहोत. आणखी यामध्ये वाढ होऊन तो प्रति दिन ९००० मे. टनापर्यंत गाळप हाईल. शासनाने सिरप ते इथेनॉलवरील उठविल्यामुळे कारखान्याचे सुमारे १२०० ते १५०० मे. टन ऊस गाळप जास्तीचे होत आहे.त्यामुळे ऊस उत्पादकांचा ऊस
वेळेवर गाळप होईल. या हंगामात कारखान्याचे १२ लाख मे. टन ऊस गाळपाचे बंदी उद्दिष्ट असून कारखाना ते पूर्ण करणार आहे. कारखान्याचा को जन प्रकल्प, आसवानी प्रकल्प सुरळीत सुरू आहेत. यावेळी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले की,कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात जून व जुलैमध्ये केली आहे. यामुळे सुमारे चार ते पाच लाख मे. टन ऊस या महिन्यातील आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या ऊसतोडी वेळेवर करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने योग्य नियोजन केले आहे. या हंगामात कारखान्याच्या १७ दिवसांत १,३३,०६८ मे. टन उसाचे गाळप होऊन १,२१,१११ क्विंटल पोती साखर उत्पादन केले आहे. को-जनरेशनमधून ७५ लाख युनिट वीजनिर्मिती केली असून आसवानी प्रकल्पामधून ११ लाख बल्क लि.उत्पादन घेतले आहे. आसवनी प्रकल्पाकडील ज्यूस ते इथेनॉल प्रकल्पही सुरू केला असल्याचे सांगितले.यावेळी संचालक दिनकर मोरे,उमेश परिचारक, दिलीप चव्हाण,ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे,बाळासो यलमर, भगवान चौगुले,लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे,भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सीताराम शिंदे, राणू पाटील, दाजी पाटील, दिलीप गुरव उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments