Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

 जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार




सोलापूर(कटूसत्य वृत्त):-जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या हस्ते करण्यात आला.

जागतिक दिव्यांग दिनाचे निमित्त साधून हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. याप्रसंगी बोलताना कोहिनकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्रगतीमध्ये दिव्यांग कर्मचारी व अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. यापुढेही चांगले काम करून जिल्हा परिषदेचा लौकिक वाढवावा, असे आवाहन केले. स्वागत कर्मचारी युनियनचे प्रदेश सरचिटणीस विवेकानंद लिंगराज यांनी केले.

याप्रसंगी दिव्यांग कर्मचारी  संघटनेचे सचिव लक्ष्मण वंजारी, हरीश मेत्रस, पिराजी सुरवसे, मुशीर कलादगी, मनोज राठोड, भीमाशंकर तेली, राम चव्हाण, आरती माढेकर, प्रज्ञा कुलकर्णी, वीरभद्र हिरजे, रामकृष्ण पाटील, शैलेश पाठक, जयंत पाटील, संजय सातपुते, अमित शहा, संतोष नीळ, पंकज वेदपाठक,रामकृष्ण पेरला, प्रताप चव्हाण, मनोज राऊत आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक अध्यक्ष तजमुल मुतवल्ली यांनी केले. सूत्रसंचालन  डॉ. एस. पी. माने तर आभार पिराजी सुरवसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे, सचिव विलास मसलकर, राकेश सोडी, श्रीशैल देशमुख, रफिक शेख, वर्षा अवधूर्ती, महानंदा कुंभार, विशाल घोगरे, रोहित घुले, श्रीधर कलशेट्टी, शिवाजी राठोड, संतोष शिंदे, अंबिका वाघमोडे, निर्मला राठोड, स्वाती स्वामी आदींनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments