मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा जल्लोष...
सोलापूर (कटूसत्यवृत्त):- मतदार राजा व लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महायुतीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल. महाराष्ट्रात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आल. कॉमन मॅन मुख्यमंत्री विकासाचा एकच वादा अजित दादा आणि देवाभाऊ यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा विकासाची ज्योत प्रज्वलीत केली.गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री शपथ विधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला. मी पुन्हा येणार हे वाक्य देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सिद्ध करून दाखवलं आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे व अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.या शपथ विधीचा जल्लोष सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला. जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालया समोर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या आदेशान्वये व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वात फटाक्यांची आतिषबाजी,गुलालाची मुक्त उधळण, ढोल - ताशाच्या निनादात हा जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी महायुती सरकारचा विजय असो,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, एकच वादा अजित दादा विकासाचा वादा अजित दादा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी सोलापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले, ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी सर, महिला शहराध्यक्ष संगीता ताई जोगदनकर, महिला शहर कार्याध्यक्ष चित्रा ताई कदम, सेवादल अध्यक्ष प्रकाश भाऊ जाधव, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर भाई शेख, युवती शहराध्यक्ष किरण ताई माशाळकर , दक्षिण महिला कार्याध्यक्ष कांचन ताई पवार, सरचिटणीस अर्चना ताई दुलंगे,सुरेखा ताई घाडगे,युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का , युवक पक्ष संघटक दत्ता बडगंची, डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप माने, डॉक्टर विश्वजीत रजपूत, वैद्यकीय शहराध्यक्ष बसवराज कोळी, सरचिटणीस शामराव गांगर्डे, महेश कुलकर्णी , उत्तर विधानसभा अध्यक्ष एड अमोल कोटीवाले , दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे , भास्कर अडकी, प्रकाश झाडबुके, एम एम इटकळे, दक्षिण अल्पसंख्यांक अध्यक्ष मूहीज मुल्ला, दक्षिण अल्पसंख्यांक संघटक जाहीर शेख, अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने, कुमार जंगलेकर , असंघटित कामगार अध्यक्ष मार्तंड शिंगारे, संजय सांगळे, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप बाळशंकर, दत्ता बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड,श्रेयस घाडे, यांची उपस्थिती होती..
0 Comments