Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी दुमाला उपसरपंच पदी निकिता खेडकर यांची बिनविरोध निवड

 पिंपरी दुमाला उपसरपंच पदी निकिता खेडकर यांची बिनविरोध निवड

 शिरूर (कटूसत्य वृत्त):- पिंपरी दुमाला  येथील येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निकिता विजय खेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र काळूराम डोळस हे होते . मावळते उपसरपंच शरद खळदकर यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंचपद रिक्त होते. एकच अर्ज असल्याने निकिता खेडकर  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य माणिक म्हाळसकर शरद खळदकर जयश्री सोनवणे तेजश्री चिखले ग्राम विकास अधिकारी विशाल ढसाळ उपस्थित होते. निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली. या निवडी वेळेस उपस्थितीमध्ये पो पाटील संतोष जाधव सोमेश्वर देवस्थान अध्यक्ष सुनील सोनवणे खजिनदार शेखर पाटेकर कार्याध्यक्ष अभिषेक शेळके सचिव श्रीकांत सोनवणे मा उपसरपंच ह भ प संदीप सोनवणे म सरपंच मनिषा ताई कैलास खेडकर मा शालेय अध्यक्ष कल्पना खळदकर त अध्यक्ष अमोल चिखले उद्योजक -मयूर बडदे प्रकाश चिखले विशाल सोनवणे अमोल डोळस जितू दुर्गे अमोल दुर्गे शरद दुर्गे रसिक चिखले पै भरत खेडकर कुमार खेडकर शुभम चिखले साहिल डोळस किरण खळदकर जयराम चिखले विशाल खळदकर अजित खळदकर जयसिंग कळसकर योगेश चिखले प्रतीक चिखले आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments