Hot Posts

6/recent/ticker-posts

फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर करतात कौतुकाची थाप

 फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी अनोख्या पद्धतीने 

विद्यार्थ्यांवर करतात कौतुकाची थाप

    बार्शी  (कटूसत्य वृत्त):- कोणतेही क्लासेस मध्ये किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये आपल्या शाळेचा विद्यार्थी यशस्वी झाल्यावर त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याची अनोखी पद्धत त्याप्रमाणे अबॅकस तृतीय पातळी स्पर्धेमध्ये बार्शीच्या अथर्व शिंदेला प्रथम पारितोषिक

डिजिटल जगताप क्लासेस संचलित जगताप अबॅकस लर्निग मार्फत घेण्यात आलेल्या  राज्यस्तरीय तृतीय पातळी स्पर्धेमध्ये बार्शीतील अथर्व अभिजीत शिंदे याने प्रथम पारितोषिक मिळवित बार्शीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

गुरुवार, दि. 23 डिसेंबर, 2024 रोजी जगताप लर्निंग क्लासेस येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्यास पारितोषिक प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी बार्शीतील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक सिंधू देशमुख यांचेसह जगताप क्लासेसचे संचालक प्रा. तानाजी गलांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांसह जगताप अबॅकस लर्निगच्या संचालिका सौ. प्रणाली जगताप, सहशिक्षिका सौ. अमृता पवार फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर करतात कौतुकाची थाप यांनी दिली हनुमंत चव्हाण सर, माया सावंत मॅडम, प्रतिमा हावळे मॅडम, तानाजी अंकुशे सर जगताप क्लासेस मार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी राज्य पातळी, राष्ट्रीय पातळी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये बार्शी शहर व तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवितात.


अबॅकस मध्ये अतिशय अवघड मानल्या जाणाऱ्या तृतीय पातळी स्पर्धेमध्ये अथर्वने मिळविलेल्या या यशासाठी सर्व स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments