फेंगल चक्रीवादळाची भीती; सोलापुर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली, दर घसरले
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळाने हाहाकार माजविला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवत आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाली असल्याने पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.
यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांद्याची काढणी करत विक्रीसाठी मार्केटमध्ये नेत आहे. यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे.
दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये फेंगल चक्रीवादळ धडकले आहे. हे चक्रीवादळ हळूहळू पुढे सरकत असून वादळामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील चक्रीवादळाचा परिणाम जाणवत असून मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर काही भागात पाऊस देखील पडला आहे. परिणामी शेती पिकांचे नुकसान होत आहे. याच भीतीने कांदा उत्पादक शेतकरी सावध झाला आहे.
८५० ट्रक कांद्याची आवक
फेंगल चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या भीतीने अनेक शेतकरी कांदा काढणी करत लागलीच मार्केटमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. यामुळे सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसात जवळपास ८५० ट्रक कांद्याची आवक झाली असून कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. सर्वसाधारण कांद्याला प्रतिक्विंटल दोन ते तीन हजार रुपये भाव मिळत आहे.
0 Comments