Hot Posts

6/recent/ticker-posts

नूतन आ. राजू खरे यांचा हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार

 नूतन आ. राजू खरे यांचा हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार




फुलचिंचोली(कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहर हे नॅशनल हायवेच्या मधोमध शहर वसले
आहे परंतु या शहराचा विरोधकांनी विकास केला नाही उलट येथील सकीय कार्यालये, बाजारपेठ, सरकारी दवाखाना आनगरला नेऊन शहर भकास केले. मोहोळ  शहराने मला जवळजवळ १५ हजार ५०० मतदान पोल झाले त्यापैकी १२ हजार मतदान म्हणजे ८० टक्के मतदान राजू खरे यांना केले त्यामुळे मोहोळ शहराचा कायापालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे नूतन आ. राजू खरे यांनी स्पष्ट केले.मोहोळ शहरातील नाईकवाडी नगर येथे नूतन आ. राजू खरे यांचा हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, उमेश पाटील, प्रथम नगराध्यक्ष रमेश बारस्कर, विकी देशमुख, राजाभाऊ रसाळ, सत्यवान देशमुख, सलमान सय्यद, अस्लम शेख, रज्जाक पठाण, सुबोधित शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नूतन आमदार राजू खरे यांचा भव्य सत्कार समारंभ करण्यात आला व मोठ्या जल्लोषात स्वागत ही करण्यात आले. पुढे बोलताना आ. राजू खरे म्हणाले की, मोहोळ शहरात पाणीटंचाई असून आणि दुष्काळात मी शहराला पाणीपुरवठा केला आहे, त्याम  ुळे निवडून आल्यानंतर सुद्धा पाणीवाला दादा म्हणून तुतारीला मतदान केले असल्याचे महिला भगिनींनी सांगितले. रस्ता, पाणी, सांडपाणी, गार्डन आदीसह सर्व सुख सोयींनी मोहोळ शहर समृद्ध करणार असून अकलूज,बारामतीच्या पुढे मोहोळ शहर मकार करण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेला जसे पक्ष बाजूला ठेवून सर्वजण एकत्र आले त्याप्रमाणेच विकास करण्यास वरती सुद्धा सर्वांनी एकत्र व्हावा पक्षाची जोडे बाजूला ठेवून विकास करूया. नगर विकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार असल्यामुळे निधीची कमतरता पडणार नसल्याचे राजू खरे यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments