एड्स दिन: सरदारबी कॉलेजची जनजागृती रॅली
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- एक डिसेंबर जागतिक एड्स दिना निमित्त मंगळवारी
दि. ३ डिसेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय मोहोळ व सरदार बी नर्सिंग कॉलेज मोहोळ यांच्या
संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. ही रॅली सरदार बी नर्सिंग कॉलेज,ग्रामीण रुग्णालय तहसील कार्यालय, मुख्य बाजारपेठ येथून काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी जनजागृती चे पोस्टर्स दाखविले तर एड्सवर घोषणाही देण्यात आल्या. या रॅलीमध्ये माहितीपत्रक सुद्धा वाटण्यात आली. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे विद्यार्थ्यांनी एड्स बद्दल पथनाट्य सादर केले. या पथनाट्य मध्ये गैरसमज तो का होतो. आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. याबद्दल विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. या कार्यक्रम साठी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक रागिणी पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आयसीटीसी समुपदेशक सुनाबी शेख यांनी केले तर आभार कांबळे यांनी मानले. या रॅलीसाठी सरदार बी कॉलेजचे अध्यक्ष डॉ. नसीर खान,शिक्षिका रत्ना तरडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
0 Comments