मोहोळ विधानसभा मतदार संघातील विकास कामासाठी कोणतीही आडकाठी येणार नाही
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात सरकार जरी महायुतीचे आले असले तरी सरकारला सर्व
जनता आणि मतदारसंघ समान असतात त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदार संघातील विकास कामासाठी कोणतीही आडकाठी येणार नाही असा मला विश्वास आहे. त्यामुळे
मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही. मतदार
संघातील रस्ते, पाणी, आरोग्य, मोहोळ मतदारसंघातील नागरिकांनी नूतन आमदार राजू खरे यांचा सत्कार केला.वीज, शिक्षण यासह भीमा नदीचे प्रदूषण, तालुक्यातील बेरोजगारी,भीमा नदीवर बॅरेजेस बंधारे या कामाला प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन मोहोळचे नूतन आ.राजू खरे यांनी मतदारसंघातील नागरिकांशी बोलताना केले. बुधवारी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील आ. खरे यांच्या फार्महाऊसवर त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या मोहोळ मतदारसंघातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी नागरिकांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या. यावेळी पुढे बोलताना आ. खरे म्हणाले कि,मी आमदार नसतानाही मागील तीन वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी पुरवठा केला. अडल्या नडल्याना मदत केली. आता तर मी आमदार आहे, निधी कसा आणायचा याची मला कल्पना आहे. सरकार जरी महायुतीचे असले तरी सरकारला सर्व राज्यातील जनता सारखीच असते त्यामुळे विकास कामाच्या
निधीमध्ये कसलीही आडकाठी येणार नाही याची खात्री आहे. मोहोळ तालुक्यात मोठ्या
प्रमाणात बेरोजगारी आहे, आजही अनेक गावे चांगले रस्ते आणि पिण्याचे शुद्ध पाणी यापासून वंचित आहेत, सुरळीत वीजपुरवढ्याचा प्रश्न असो कि, शाळा, प्राथमिक आरोग्य सुविधा असोत या कामाना प्राधान्य दिले जाणार आहे, तालुक्यातून भीमा नदी वाहते, मात्र भीमानदीचे पाणी प्रदूषित आहे भीमा नदीची प्रदूषण मुक्ती आणि नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा यासाठी विशेष लक्ष देणार आहे, असेही यावेळी आमदार खरे यांनी सांगितले. भीमा नदीवर बॅरेजेससाठी प्रयत्न करणार : खरे भीमानदी हा मतदारसंघातील शेतीच्यापाण्याचा प्रमुख स्रोत आहे, टंचाईच्या काळात भीमा नदी कोरडी पडते. भविष्यात सोलापूरची पाईप लाईन पूर्ण झाल्यानंतर भीमा नदीला उजनीतून पिण्यासाठी पाणी सोडले जाणार नाही, हे संकट लक्षात घेऊन शेतीच्या पाण्यासाठी भीमा नदीवर मोठे बॅरेजेस बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे,अशीही ग्वाही खरे यांनी दिली.
0 Comments