Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी प्रशालेचे शालेय सॉफ्टटेनिस व योगासन स्पर्धेत यश

 छत्रपती शिवाजी प्रशालेचे शालेय सॉफ्टटेनिस व योगासन स्पर्धेत यश



पुणे (कटूसत्य वृत्त):- विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा -विपश्यना सोनवणे - प्रथम, जॅक भंडारे - द्वितीय,योसेफ नाईक - तृतीय शालेय पुणे विभागीय सॉफ्टटेनिस स्पर्धा पुणे येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत प्रशालेतील विपश्यना सोनवणे हीने 14 वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला तर 19 वर्षाखालील मुलांच्या गटात जॅक भंडारे याने द्वितीय क्रमांक व योसेफ नाईक याने क्रमांक मिळविला आहे या सर्व खेळाडूंची दिनांक 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे तर लातूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत अमृता गुंफेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
 या खेळाडूंचा सत्कार प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, तानाजी माने, पर्यवेक्षक श्रीपादराव जगदाळे, संतोष गवळी, सचिन गायकवाड, पालक प्रसाद सोनवणे व लक्ष्मी सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, शालेय समिती चेअरमन शिवदास चटके, जनरल सेक्रेटरी महेश माने, संस्थेचे सर्व. पदाधिकारी, उपमुख्याध्यापिका जयश्री साठे.


Reactions

Post a Comment

0 Comments