Hot Posts

6/recent/ticker-posts

खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रमांतर्गत गुजरात अभ्यास दौऱ्यासाठी ८ डिसेंबरला परीक्षा

 खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रमांतर्गत गुजरात अभ्यास दौऱ्यासाठी ८ डिसेंबरला परीक्षा

अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक आणि नवोदित उद्योजकांसाठी गुजरात गांधीनगर येथे शिवरत्न शिक्षण संस्था आणि शिवामृत दूध संघ यांच्या सहकार्याने एक विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले.अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उद्योजक व्यावसायिकांच्या करीता ८ डिसेंबर रोजी शिवरत्न नाॅलेज सिटी अकलूज येथे सकाळी 9.30 वाजता परीक्षेसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. लेखी आणि तोंडी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उद्योजकांना विविध उद्योगांची पाहणी करण्याची आणि तज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची संधी मिळेल.

या उपक्रमाचा उद्देश नवीन उद्योजक निर्माण करणे आणि सध्याचे उद्योजक अधिक सक्षम करणे हा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देणे, बँकांकडून कर्ज मिळवून देण्यात मदत करणे आणि विविध उद्योग संस्थांशी करार करण्याची संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.

सदर खासदार नवउद्योजक विकास कार्यक्रमांतर्गत गुजरात अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी खालील दिलेली लिंकवर जाऊन नोंदणी करायची आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments