Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे 26/11 शहीद दिनानिमित्त सत्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान

 टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे 26/11 शहीद दिनानिमित्त सत्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  मुंबई येथे हॉटेल ताजमहल येथे झालेल्या अतेरिकी हल्ल्यामध्ये पोलिस दलातील शहीद जवानांसाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने  पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थित 26/11 च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना सकाळी 11 वाजता त्यांच्या प्रतिमेवरती फुले वाहून श्रद्धांजली वाहून 
या वेळी रक्तदानाला सुरुवात करण्यात आली  या रकदान निमित्त दिवसभर टेंभुर्णी शहरातील राजकीय मंडळींनी सामाजिक संघटनाने भेट देऊन रक्तदान  केले या मध्ये तिसऱ्या आघाडीचे युवा नेते रावसाहेब नाना देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के -पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश लोंढे, बाळासाहेब ढगे, आर पीआयचे जयवंत पोळ, ॲड संतोष कानडे,
तसेच टेंभुर्णी पोलिस स्टेशन चे ए पी आय गिरीश जोग, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक, कुलदीप सोनटक्के, पोलिस उपनिरीक्षक सुरवसे मॅडम व सर्व पोलीस कर्मचारी या प्रंसंगी रक्तदान करून  पोलीस अधिकारी, अंमलदार व सामाजिक कार्यकर्ते असे एकूण 71लोकांनी रक्तदान केले टेंभुर्णी पोलीस ठाण्यात पहिल्यांदा पोलिस शहिदांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात अल्याने पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांचे टेंभूर्णी परीसरातू कामाबद्दल कौतुक होत आहे अशीच कामगिरी कायदा व सुव्यवस्था राखण्यात ठेवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून व टेंभुर्णीच्या व्यापारी वर्गातून होत आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments