कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रशालेमध्ये संस्थेच्या मार्गदर्शिका व प्रभाग क्रमांक 26 च्या नगरसेविका सौ. प्रियाताई जयकुमार माने यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रथमतः शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन वैद्यकीय अधिकारी डाॅ.शैला सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड यांनी केले.या कार्यक्रमासाठी मजरेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पी. एच. एन. निलोफर शेख, तुकाराम सुर्यवंशी ,शबाना शेख , वंदना कांबळे, जोती गायकवाड,मनोज सोनकांबळे, जावेद शेख, लॅब टेक्नीशियन भिमाशंकर बावगे, मोबीन शेख, मल्लीकार्जुन राफेली व आशा वर्कर सर्व स्टाफ यावेळेस उपस्थित होता. प्रशालेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी, रक्त तपासणी करण्यात आली. हिमोग्लोबिन, शुगर, थायरॉईड, तपासणी करण्यात आली. या प्रसंगी डाॅ सरोदे यांनी विद्यार्थ्यांनी रक्त रक्त वाढीसाठी हिरव्या पालेभाज्या, खजूर, मोडआलेली कडधान्य, फळे यांचा आहारात समावेश करावा असे म्हटले. आरोग्यासाठी योगा,प्रणायाम व व्यायाम नियमित करावा असे म्हटले.आरोग्य संपन्न शरीर हे आपली प्रसंन्नता वाढवते व आपल्या बुद्धिमतेत वाढ होते असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी 750 विद्यार्थ्यांचे रक्त तपासणी करण्यात आले. या कार्यक्रमास पर्यवेक्षक वसंत गुंगे , प्रा. संजय जाधव , प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सुवर्णा धारेराव यांनी केले. आभार संजय घोडके यांनी केले.
0 Comments