हरीश पिंपळे होणार नामदार' चे मित्रमंडळी कडून बॅनरबाजी
अकोला (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप देखील होणार आहे. या निमित्ताने सतत चार वेळा मुर्तीजापुर मतदारसंघात निवडून आलेले आमदार हरेश मारुती आप्पा पिंपळे यांचा मंत्रिमंडळात समावेश समावेश व्हावा अशी अपेक्षा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व बुथ प्रमुख तालुकाप्रमुख महिला कार्यकर्त्या यांच्यामध्ये चर्चेचा विषय चालला आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात मूर्तिजापूर एमआयडीसीचा विकास, एमआयडीसी मध्ये उद्योग आणून मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम मिळणार, विदर्भातील रेकूरवाडी शकुंतलाचा ब्रॉड गेजचा प्रश्न, मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघातील अनेक ज्वलनशिप विकासात्मक मुद्दे मुर्तीजापुर मतदारसंघात इतिहासात प्रथमच मंत्रीपदाचा बहुमान असेल अशाच चर्चा होत राजकीय तज्ञांच्या मते उशिरा उमेदवारी घोषित झालेला उमेदवाराचा कुठलाच बाऊ न करता विकास कामांना विकास कामांच्या जोरावर आमदार हेच पिंपळे यांनी प्रचंड मताधिक्याने चौथ्यांदा विजय आपल्या पदरात पाडून चौकार तसेच अनुसूचित जातीचे असल्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता विश्वासनीय सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे. अशी चर्चा सध्या राजकीय वर्गात चालू आहे.
0 Comments