Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस वकिलांकडून संविधानाच्या जागृतीसाठी भव्य राज्यस्तरीय पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन

 माळशिरस वकिलांकडून संविधानाच्या जागृतीसाठी भव्य राज्यस्तरीय पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- जागर संविधानाचा अभियाना अंतर्गत भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय भव्य पथनाट्य व रांगोळी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन माळशिरस वकिलामार्फत करण्यात आले असून त्याची सुरवात वकिल संघटनेचे अध्यक्ष सौ.मोहिनी देव यांच्या हस्ते माळशिरस वकिल संघटनेच्या कार्यालयात झाले आहे.
           या स्पर्धेत प्रवेश विनामुल्य राहणार असून स्पर्धकांना वयाची व शिक्षणाची अट नाही नांव नोदणीची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२५ असून स्पर्धा ही दि.१९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. माळशिरस येथे सुरू होईल व स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण दि.२५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला व संघाला प्रमाणपन्न देण्यात आल्याची माहिती आयोजक समितीचे ॲड.सुमित सावंत आणि ॲड.धनंजय बाबर यांनी सांगितले.
        या स्पर्धा आयोजन समितीमध्ये ॲड.सुनिता सातपुते,ॲड.रजनी गाडे- सोनवळ,ॲड.धनंजय बाबर, ॲड.अमृत भोसले,ॲड.सुमित सावंत,ॲड.भारत गोरवे,ॲड. नितीन भोसले,ॲड.वैभव धाईजे, ॲड.अजिंक्य नवगिरे ॲड. सुयश सावंत,ॲड.धैर्यशिल भोसले,ॲड.वैशाली कांबळे, ॲड.मनोज धाईंजे,ॲड. अभिषेक चंदनशिवे,ॲड.निलेश जाधव,ॲड.दत्तात्रय सावंत व सर्व सन्माननीय माळशिरस वकील संघटना सदस्य तालुका माळशिरस यांचा समावेश आहे.
          या स्पर्धेतील बक्षीस पुढील प्रमाणे-पथनाट्य स्पर्धेसाठी पहिले बक्षीस १०,०००/- रूपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,दुसरे बक्षीस : ७,०००/- रूपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तिसरे बक्षीस : ५,०००/- रूपये स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,रांगोळी स्पर्धेसाठी- पहिले बक्षीस 1HP आटा चक्की
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,दुसरे बक्षीस मिक्सर ग्राईंडर स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,तिसरे बक्षीस डिनर सेट स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
      तरी ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घ्यावचा आहे त्यांनी आपली नांवे खालील मोबाईल नंबरशी संपर्क करून आपले नांव नोंदणी करावी.ॲड.सुमित सावंत (मो.9970944991),ॲड.
भारत गोरवे (मो.9850736190),ॲड. सुयश सावंत (मो.8483844049),ॲड. वैशाली कांबळे (मो.8329525003)

Reactions

Post a Comment

0 Comments