अंकुश अवताडे यांनी दिल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा
कुरुल (कटूसत्य वृत्त):- राज्यामध्ये विरोधकांनी टाकलेलं चक्रव्यूह भेदून अतुलनीय कामगिरी करत भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून आणल्या शिवाय तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल भाजपा मोहोळ युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश अवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शुभेच्छा देत अभिनंदन केले.
यावेळी बोलताना आवताडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपा व महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र ती मरगळ झटकून लोकसभा निकालाच्या दुसऱ्या दिवशीच भाजप कामाला लागली होती. विधानसभा निवडणुकीत जागा वाटप करण्यापासून ते प्रचार आणि प्रसाराचे सूक्ष्म नियोजन करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच मतदारसंघात मायक्रो प्लॅनिंग केले. शिवाय राज्य सरकारने राबविलेल्या सर्वसामान्य जनता, शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक यांच्या बद्दलचे असलेले धोरण जनतेने स्वीकारले आणि लाभार्थी जनतेने देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपला स्वीकारले. त्यामुळे या यशाचं सर्व श्रेय टीम लीडर म्हणून देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जाते असे त्यांनी सांगितले.
दरम्यान निवडणुकीतील या विजयाबद्दल व सरकार स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. श्रीकांत भारतीय, आ.विक्रांत पाटील यांची प्रतिमा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
0 Comments