माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी मनोज राऊत यांची निवड
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस येथे संपन्न झाली.यावेळी आगामी दोन वर्षासाठी नूतन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. यामध्ये माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज राऊत तर उपाध्यक्ष पदी एल डी वाघमोडे, दिनेश माने माने देशमुख व सचिव पदी उदय कदम, सहसचिव पदी अभिजीत जाधव, खजिनदार पदी सतिश पारसे तसेच कायदेशीर सल्लागार पदी अॅड. जी. पी कदम यांची एकमताने निवड करण्यात आली.माळशिरस तालुका पत्रकार संघ हा धर्मदाय आयुक्त सोलापूरकडे नोंदणी केलेला संघ असून अतिशय पारदर्शकपणे कारभार केला जातो. वर्षभरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वह्या वाटप करणे, दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे, विविध यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात.संघटनेच्या स्थापनेपासून प्रा.विनोद बाबर, निनाद पाटील,संजय देशमुख यांनी यशस्वी रित्या कारभार केला असून यापुढेही पत्रकार संघाच्या उन्नतीसाठी पत्रकार संघाचे माजी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे नूतन पत्रकार संघाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मनोज राऊत यांनी सांगितले.यावेळी मावळते अध्यक्ष संजय देशमुख, उपाध्यक्ष शाहरुख मुलाणी, निनाद पाटील, प्रा विनोद बाबर, संजय पवार, ओंकार आडत व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित पत्रकारांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments