मोहोळ मध्ये डॉक्टर असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेत एमडीए सुपर स्टार संघाचा विजय
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ डॉक्टर्स प्रीमिअर लीगने सलग दुसऱ्या वर्षी डॉक्टरांचे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सिरीज पद्धतीने १२ ओव्हरची खेळण्यात आली होती. या स्पर्धेत मोहोळ तालुक्यातील सर्व डॉक्टरांचा सहभाग होता. सलग तीन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेत एम डी ए वॉरियर्स व एम डी ए सुपरस्टार्स यांच्यात अंतिम लढत झाली. अंतिम सामन्यात सुपरस्टार्सचे कर्णधार डॉ. दीपक वाघमोडे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
डॉक्टर्स प्रीमिअर लीग मोहोळ ने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या डॉक्टरांच्या क्रिकेट सामन्यात एम डी ए वॉरियर्स व एमडी ए सुपरस्टार्स यांच्या संघात अंतिम लढत होऊन एम डी ए सुपरस्टार्स हा संघ २२ धावांनी विजयी झाला.
चांगली सुरुवात झालेली असताना डॉ. प्रीतीनंद गवळी बाद झाल्याने वॉरियर्सचा उत्साह वाढला. त्यानंतर मात्र १० व्या षटकापर्यंत डॉ. वसीम व डॉ. अमोल हराळे यांनी संयमी खेळी करत धावसंख्या १३२ पर्यंत वाढवली. डॉ. वसीम शेख बाद झाल्यानंतर धावसंख्या मंदावल्याने १२ षटकामध्ये १४५/४ असे आव्हान वारियर्सपुढे राहिले. डॉ. वसीम शेख ९१ तर डॉ. अमोल हराळे यांच्या नाबाद ३१ धावा महत्त्वाच्या ठरल्या. वारियर्सकडून डॉ. सुनील गायकवाड यांनी २ तर डॉ. मनोज देवकते व डॉ. युवराज यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले. वारियर्सकडूनही डॉ. हिंदुराव व डॉ. संजय भोसले यांनी उत्कृष्ट सुरूवात केली त्यानंतर डॉ. सचिन राऊत यांनी उत्तम साथ दिली परंतु तेही धावबाद झाले. डॉ. संजय भोसले यांना डॉ. गणेश भोसले यांनी त्रिफळाचित केले. डॉ. संजय भोसले यांनी आज ६६ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये डॉ. वसीम शेख व डॉ. अमोल हराळे यांनी प्रत्येकी २ गडी, डॉ. गणेश यांनी १ गडी बाद केला. एकूण धावसंख्या १२४/६ अशा प्रकारे चुरशीच्या सामन्यांत सुपरस्टार्सनी मालिका २-१ अशी जिंकली.
तिन्ही सामने रंगतदार झाले, सर्वच डॉक्टर्सनी सामन्यांचा आनंद घेतला. आरोग्यासाठी व्यायाम व खेळ अत्यंत आवश्यक आहेत, हा मेसेज यामधून समाजापर्यंत जावा, याच उद्देशाने हे सामने घेण्यात आले असे डॉ. डोंगरे यांनी याप्रसंगी सांगितले. डॉ. शैलेश झाडबुके व डॉ. प्रमोद पाटील यांनीही यामध्ये सहभागी होऊन सर्वांचा उत्साह वाढवला. सोहेल सय्यद व साकिब शेख यांनी पंच म्हणून उत्तम कार्य पाहिले.
संघ एम डी ए सुपरस्टार्स संघाची खेळाडू
डॉ.दीपक वाघमोडे कर्णधार डॉ.अमोल हराळे उप कर्णधार), डॉ .महेश राऊत ,डॉ.जयप्रकाश मोहिते,डॉ. शैलेश झाडबुके, डॉ. शहाजी डोंगरे, डॉ वसीम शेख, डॉ अक्षय काळे, डॉ प्रीतीनंद गवळी, डॉ अभय कुर्डे, डॉ.गणेश भोसले
संघ एम डी ए वॉरियर्स संघाचे खेळाडू
डॉ.युवराज क्षीरसागर (कर्णधार)
डॉ.सचिन भोसले (उप कर्णधार ),डॉ. संजय भोसले, डॉ. मनोज देवकते, डॉ. जिलानी खान
डॉ. प्रमोद पाटील, डॉ. हिंदुराव काळे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. सचिन राऊत, डॉ.विश्वनाथ शेंडे
डॉ.सागर फाटे या स्पर्धेत या दोन संघांनी सहभागी होता.
0 Comments