मूर्तिजापूरात दिवसाढवळ्या चोरी ; ३० हजार रोख व १ लाख २० हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी केला हात साफ..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 2, 2024

मूर्तिजापूरात दिवसाढवळ्या चोरी ; ३० हजार रोख व १ लाख २० हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी केला हात साफ..!

 मूर्तिजापूरात दिवसाढवळ्या चोरी ; ३० हजार रोख व १ लाख २० हजारांच्या

 मुद्देमालावर चोरट्यांनी केला हात साफ..!

अवघ्या ७२ तासात सहावी घटना ; असुरक्षित असल्याचा नागरिकांचा सुर..!


 मूर्तिजापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील छत्रपती शिवाजी नगर मधील एका घराचे कुलुप तोडून अज्ञात चोरटयांनी रोख रक्कमेसह दागिने लंपास केल्याची घटना  १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १०.४५ वाजताच्या दरम्यान उघडकिस आली.

 शहरात शिवाजी नगरातील रहिवासी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गोपालसिंग प्रतापसिंग राठोड, वय ८० वर्ष  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नेहमी प्रमाणे आठवडयातून एकदा म्हणजेच दर रविवारी धार्मिक कामासाठी सत्संगामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी ८ वाजता घराला कुलुप लावुन सहपरिवारासह  गेले होते . धार्मिक काम आटोपून घरि परत आले असता घराच्या दाराचे कुलुप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले व दार आत मधून लावलेले दिसले . त्यामुळे नातवाला घराच्या मागच्या दिशेने असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगितले असता ते ही दार उघडलेले होते . समोरचे दार उघडले असता  कपाटातील कपडे,वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्यावरून चोरी झाल्याचा संशय आल्याने शोध घेतला असता सोन्याच्या ५ अंगठ्या ( प्रत्येकी एक तोडा ) अंदाजे किंमत ४० हजार, एक सोन्याचे बिस्कीट ( अडिच तोडे ) अंदाजे किंमत ८० हजार रुपये व ३० हजार रोख रक्कम असा एकुण १ लाख ५० हजार रुपयांची चोरी झाल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले असून प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

                  यावर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे व शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.

पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मागदर्शनात  उप-पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी,अंमलदार  गजानन ताठे ,नंदकिशोर टिकार,मुन्ना पांडे,पो का सचिन दुबे, अनिल राठोड,मंगेश विल्हेकर, पवण बोडखे करीत आहेत.  

 मूर्तिजापूर शहरात वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता कर्मचारी शोध मोहीमेसाठी पाठविले असून सदर प्रकरणाचा छडा लवकरच लावल्यात येईल 

 - अजित जाधव   पोलीस निरीक्षक

शहर पोलीस स्टेशन, मूर्तिजापूर.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages