महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या अध्यक्षपदी सदाशिव बेडगे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या अध्यक्षपदी सदाशिव बेडगे यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी लोकशाहीचे राज्य आहे या राज्यात सन 2012 पर्यंत 12500 सार्वजनिक ग्रंथालय कार्यरत होती 25 मे 2012 साली आघाडी सरकारने महसूल खात्यामार्फत ग्रंथालयाची पटपडताळणी केली आणि सध्या राज्यात 11150 ग्रंथालय अस्तित्वात आहेत शासनाच्या उदासीनतेमुळे तसेच राज्य ग्रंथालय संघ,व इतर अनेक संघटनामुळे ग्रंथालय व ग्रंथालय कर्मचारी यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने ग्रंथालय कायदा होवून 57 वर्षे झाली तरी राज्यातील ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून राज्यातील ग्रंथालय कर्मचारी यांच्या आग्रहाखातर नवीन संस्था स्थापन करण्यात आली सुनील दत्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी यांची निवड करण्यात आली
अध्यक्ष सदाशिव बेडगे
कार्याध्यक्ष सुनील दत्त पाटील
उपाध्यक्ष विजय पाटील , बालाजी कांगणे , वसंत धोत्रे
सचिव धोंडिराम जेवूरकर
सहसचिव नरसिंह मिसालोलू
सहसचिव सौ.उमा पुदाले
खजिनदार निलेश क्षिरसागर
सदस्य सिद्राम मुद्देबिहाळ , मनोहर झोटे
वरील प्रमाणे एकमताने निवड करण्यात आली.यावेळी महाराष्ट्रातून मनोहर झोटे, गजानन गिते (बुलढाणा) सुनील दत्त पाटील, (सांगली) बालाजी कांगणे, (अंबेजोगाई) निलेश क्षिरसागर (पुणे) सौ. उमा पुदाले (पलूस) भीमाशंकर बिराजदार, सिध्दाराम हलकुडे, संतोष गद्दी, सिद्राम मुद्देबिहाळ, नरसिंह मिसालोलू, रामचंद्र वग्गे, धोंडिराम जेवूरकर, आदी उपस्थित होते
यावेळी भीमाशंकर बिराजदार यांना निमंत्रित सदस्य तर पुणे विभाग अध्यक्ष संतोष गद्दी, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सिद्राम मुद्देबिहाळ यांची निवड करण्यात आली शेवटी सर्वांचे आभार नरसिंह मिसालोलू यांनी मानले.
0 Comments