मोहोळ मतदार संघाचा विकास आ. यशवंत माने यांच्या
काळातच खऱ्या अर्थाने झाला - राजन पाटील
मोहोळ(कटूसत्य वृत्त):-मोहोळ मतदार संघाचा विकास खऱ्या अर्थाने आमदार यशवंत माने यांच्या काळातच झाला आहे. विरोधकांनी कोणता विकास केला याची यादी व आकडेवारी द्यावी, असे आवाहन राजन पाटील यांनी नान्नज येथील प्रचार सभेत व्यक्त केले.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गट महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारार्थ पडसाळी, रानमसले व नान्नज या गावांना भेट दिली. यावेळी माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मतदार संघातील एकही गाव विकासापासून वंचित राहिलेले नाही. प्रत्येक गावाला कोट्यवधीचा विकासनिधी देऊन कामे केली आहेत. यावेळी आ. माने म्हणाले, ज्यांनी गावात एक शौचालय अथवा पिठाची गिरणी उभी केली नाही. त्यांनी आमच्या विकासावर बोलू नये. विरोधकांनी मतदारसंघात विकासकामाऐवजी केवळ मी आणि आणि आमदार राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर टीका करण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही.
यावेळी भाजपचे शहाजी पवार, अमोल शिंदे, संतोष पवार, किसन जाधव, अविनाश मार्तंडे, दगडू भोसले, दत्तात्रय काळे, काशीनाथ कदम, विनोद सुतार, जावेद पटेल, संकेत पिसे, महेश पवार, तानाजी पवार, हनुमंत गायकवाड, सचिन पाटील, सुनील भोसले, प्रकाश चौरेकर, सुवर्णाताई झाडे, वृषाली पवार, सोनाली गवळी, केदार विभुते, सागर मुळे, परमेश्वर कोरे, दाजी गोफणे, संभाजी दडे, प्रवीण भालशंकर, संग्राम पाटील, जगन्नाथ भोर, संजय मुळे, बापू विभूते, संभाजी दडे, नीलेश गवळी, काझी अतिक, सागर माने, काजी गोपने रमेश डोंगरे. पडसाळीचे सचिन भोसले, अविनाश शिरसाट, सूरज व्यवहारे, गणेश भोसले, रानमसलेचे राजाराम गरड, दयानंद शिंदे, घनश्याम गरड, सरपंच मनोज क्षीरसागर आदी उपस्थित होते.
0 Comments