मी दिलेला शब्द पाळणार- आ. सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-मागील विधानसभा निवडणुकीत या भागातील एकही रस्ता खड्डेमय दिसणार नाही, असा मी तुम्हाला शब्द दिला होता. त्याची पूर्तता करूनच पुन्हा मी तुमच्यासमोर मतदान मागायला आलो आहे. मी दिलेला शब्द पाळणारा आहे, असा विश्वास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील तडवळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत पाटील, परमेश्वर यादवाड, संजय देशमुख, रामचंद्र अरवत, अविनाश मडीखांबे, सुरेश सद्दलगी, सुरेश गड्डी, दिलीप सिद्धे, अण्णाप्पा याबाजी, डॉ. अशोक हिप्परगी, विकी ईश्वरकट्टी, अजय मुकणार, बाबुशा करपे आदी उपस्थित होते. यावेळी आ. कल्याणशेट्टी पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत गावात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली. काही ठिकाणी नवीन रस्त्यांची बांधणी, काही ठिकाणी दुरुस्ती, तर डांबरीकरणाची कामे करण्यात आली. रस्त्यांचे जाळे विस्तारल्यामुळे गावकऱ्यांना मोठा फायदा झाला. तसेच तडवळ गावात बंदिस्त गटारे, देवीच्या मंदिरांसमोर आणि जगद्गुरू हडपद आप्पण्णा महाराज संस्था मठासमोर सभामंडप बांधणे, तडवळ ते सुलेरजवळगे रस्ता, आळगे ते तडवळ रस्ता, पानमंगळूर ते तडवळ मुंढेवाडी, कोर्सेगाव रस्ता, सुलेरजवळगे तडवळ, अंकलगे रस्ता टप्पा १ आणि २, तडवळ ते आळगी रस्ता, तडवळ ते म्हैसलगी रस्ता, गुड्डेवाडी ते तडवळ रस्ता, तडवळ ते अंकलगी आणि खानापूरपर्यंत असे रस्ते तयार करणे अशी विकासाची कामे मंजूर झाली आहेत. याशिवाय भीमनगर येथे सिमेंट रस्ता करणे, अंकलगी गेट ते बुळकावस्तीपर्यंत पाणंद रस्ता करणे, नवीन अंगणवाडी बांधणे, अक्कलकोट, जेऊर, करजगी, पानमंगरुळ, तळवड, कोर्सेगाव रस्ता सुधारणा करणे, जलजीवन मिशनअंतर्गत नळाद्वारे पाणीपुरवठा करणे ही कामे मंजूर झाली आहेत. यावेळी आळगे, शेगाव, गुड्डेवाडी, मुंडेवाडी, कल्लकर्जाळ, सुलेरजवळगे, धारसंग, केगाव खु केगाव बु, चिंचोळी आदी गावांमध्ये दौरा झाला.
0 Comments