ऍड सोमनाथ वैद्य यांनी घेतली सोलापूर बार असोसिएशनच्या वकिलाची भेट.सोलापूर दक्षिण विकासाचा वकिलासमोर मांडला अजेंडा.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांचे अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी आज सोलापूर बार असोसिएशनला भेट दिली वकिलासमोर विकासाचा अजेंडा मांडला.
मला आपणासह सोलापूरच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा हवा असून मी या भागाचा आमदार झाल्यास सर्व समाज घटकासाठी काम करीन तसेच मी स्वतः उच्चशिक्षित असून केसी विधी महाविद्यालय चर्चगेट मुंबई येथून विधी पदवी घेतली आहे. पदवीनंतर बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा साठी त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम केल्याचा अनुभवही सांगितला आहे.
19 वर्ष प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला आपण आमदार म्हणून नियुक्ती करावे तसेच आमदारकी पदी नव्या प्रशासकीय काम करणाऱ्या चेहऱ्याला काम करण्याची संधी अशी विनंती वैद्य यांनी सर्व वकिलासमोर मांडली आहे. यावेळी सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष अमित आळगे, सचिव मनोज पामुल सदस्य विनायकुमार कटारे तसेच ऍड धुरगुडे तसेच जेष्ठ वकिल मंडळी मोठया संख्येने उपस्तिथ होती.
0 Comments