Hot Posts

6/recent/ticker-posts

गुळपोळी येथे श्री भैरवनाथ जयंती निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह.

 गुळपोळी येथे श्री भैरवनाथ जयंती निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह.

                        

बार्शी(कटूसत्य वृत्त):-बार्शी तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून गुळपोळी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचे मंदिर सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.गुळपोळी येथे सालाबाद प्रमाणे श्री भैरवनाथ जयंती निमित्त वर्ष दुसरे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अखंड नामजप यज्ञ सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन 16 नोव्हेंबर पासून करण्यात आले आहे.याची रूपरेषा अशी असणार आहे,पहाटे 5 ते 6 काकडा आरती भजन, सकाळी 7 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,11 ते 12 तुकाराम गाथा भजन,दुपारी 12 वाजता भैरवनाथ महाराजांची आरती, सायंकाळी 7 ते 8 हरिपाठ, सायंकाळी 9 ते 11 हरिकीर्तन सेवा,सायंकाळी 11 ते 12 हरिजागर,असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.या सप्ताहामध्ये ह.भ.प.देविदास दस गुरुजी महाराज खडकलगाव ह.भ.प.रामचंद्र विठ्ठल गायकवाड महाराज सत्संग आश्रम महादेव टेकडी,ह.भ.प.नवनाथ महाराज साठे ढग पिंपरी,ह.भ.प.श्री कालिदास महाराज झांबरे बार्शी,ह.भ.प. भाऊसाहेब महाराज कदम घाटणे,ह.भ.प.उद्धव गरड महाराज लऊळ तालुका माढा,ह.भ.प.शेळके महाराज सत्संग आश्रम व्यासपीठ चालक, ह.भ.प.आप्पा महाराज जावळे हळदगाव,या नामवंत कीर्तनकारांची हरिकीर्तन सेवा होणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताह चा कार्यक्रम दिनांक 16/ 11/ 2024 ,रोजी सुरू झाला असून कार्यक्रमाची सांगता 23/ 11/2024 रोजी सकाळी 9 ते 11,या वेळेत ह.भ.प.आप्पा महाराज जावळे हळदगाव यांचे काल्याचे हरिकीर्तन सेवेने अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाची सांगता होईल.त्यानंतर सौ वंदना रामचंद्र उबाळे,श्री रामचंद्र बापूराव उबाळे,चि.अभिजीत रामचंद्र उबाळे,चि.अमित रामचंद्र उबाळे,कुमारी अंकीता रामचंद्र उबाळे राहणार दारफळ सीना यांचे वतीने महाप्रसाद भोजन पंगत होणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन श्री भैरवनाथ नवरात्र उत्सव व अन्नदान मंडळ व  समस्त गुळपोळी ग्रामस्थ यांच्या वतीने केले जाणार आहे. सर्व भाविकांनी संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती श्री भैरवनाथ नवरात्र उत्सव व अन्नदान मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे,भजनी मंडळ अध्यक्ष लक्ष्मण मधुकर मचाले,तंटामुक्त उपाध्यक्ष हनुमंत लक्ष्मण पाटील,मृदंगाचार्य राहुल मोहन मचाले,मंदिर व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी सूर्यकांत चिकणे व प्रेम परमेश्वर मचाले, अतुल सूर्यकांत चिकणे,राजेंद्र अभिमान चिकणे, बाळकृष्ण दत्तात्रय पिसे, शांतिनाथ जनार्दन चिकणे, अथर्व धनाजी शिंदे,सौ रेखा सूर्यकांत चिकणे,सागर सुनील चिकणे,सागर अनिल पाटील,आकाश लहू चिकणे यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील भाविकांना सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments