Hot Posts

6/recent/ticker-posts

राम सातपुते यांचे पुनश्च आमदार होण्याचे स्वप्न राम भरोसे?

 राम सातपुते यांचे पुनश्च आमदार होण्याचे स्वप्न राम भरोसे?

अकलूज (कटूसत्य वृत्त):-माळशिरस विधानसभा मतदारसंघात सध्या दुर्मिळ दृश्य जनतेला पहावयास मिळत असून,आमदार राम सातपुते यांचे पुनश्च आमदार होण्याचे स्वप्न राम भरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 गेले अनेक वर्षापासून, गुडघ्याला बाशिंग बांधून,आमदारकीसाठी संघर्ष करणाऱ्या उत्तम कार्यकर्त्यांनाही राजकारणाची दिशा बदलावी लागली आहे.  तर मोहिते पाटील यांच्या कृपाशीर्वादाने गेली, पाच वर्ष आमदारकीचा उपभोग घेणारे, राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांची साथ सोडुन,स्वता:च्या पायावर धोंडा मारून घेतला असून, यांचे पुनश्च आमदारकीचे स्वप्न भाजपाच्या जीवावर साकार होईल का? असाही प्रश्न माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे. 

    माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदार संघ असून, राम भरोसे उत्तम क्रांतीच्या वाटेवर असणाऱ्या डझनभर उमेदवार,मोठ्या उमदेने माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या रणांगणात उतरले आहेत. यामध्येही चंदन आणि बाबळीच्या वृक्षाचा फरक समजत नाही असे लोकही,निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

     भाजपने मागील पंचवार्षिकला मोहिते पाटील यांच्या जीवावर, माळशिरस तालुक्यातील जनतेच्या माती मारलेले, राम सातपुते सारखे आपत्कालीन संकट आमदार झाले.परंतु मतदार चुकला आणि विकासाला मुकला अशी गत निर्माण झाली होती.अशातच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील  यांची पुण्याई कामी आली.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या तालुक्यात विकास कामांची किमया करून दाखवत,निष्क्रिय आमदार राम सातपुते यांचे पाप धुतले,म्हणून या पापाचे फळ सोलापुरात लोकसभेवेळी राम सातपुते यांना फेडावे लागले.म्हणूनच इथली जनता विचारत आहे,हे राम... आपण पाच वर्षांत, काय केले काम!

     लोकशाही ही सर्वश्रेष्ठ प्रणाली असते.तिच्या माध्यमातून जनतेच्या आयुष्यात विकासकामांचां प्रकाश पेरायचा असतो.विकासाचे ध्येय गाठण्याची क्षमता असावी लागते,कार्याची निती स्पष्ट असावी लागते तर जनतेबद्दल तळमळ असावी लागते. सोबत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासही असावा लागतो.

राजकारण करताना, व्यक्तीगत स्वार्थाला मूठ माती देणे अपेक्षित असते परंतु तसे दिसत नाही.असे राजकीय जाणकार बोलून दाखवत असून, आमदार राम सातपुते यांचे राजकीय भविष्य धोक्याचे संकेत देत आहे?

Reactions

Post a Comment

0 Comments