Hot Posts

6/recent/ticker-posts

गुरसाळे येथील यमाई बचत गटाच्या सदस्यांना दिवाळी भेट

 गुरसाळे येथील यमाई बचत गटाच्या सदस्यांना दिवाळी भेट



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- दिवाळी सणानिमित्त गुरसाळे येथील यमाई महिला बचत गटातर्फे शिवप्रसाद महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा ऋतुजा मोरे, गुरसाळेचे सरपंच सागर खिलारे, विकास सोसायटीचे अध्यक्ष गुलाबराव गायकवाड, दत्तात्रय सूर्यवंशी, साधू सावंत, सागर सूर्यवंशी व दूध उत्पादक सभासद या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सभासदांना किराणा साहित्य वाटप करण्यात आले. गुरसाळे तालुका माळशिरस येथे २००७ साली बेबी दत्तात्रय सूर्यवंशी यांनी महिलांना सोबत घेऊन यमाई

महिला बचत गटाची स्थापना केली.या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असताना हा महिला बचत गट केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत नोंदला गेला.त्यानंतर गुरसाळे येथील बँक ऑफ इंडिया शाखेमधून दहा लाख रुपयांचे कर्ज विनातारण अल्पदराने मिळाले.त्यातून या महिलांनी संकरित गायी खरेदी केल्या आणि आपल्या कुटुंबाला हातभार कुटुबाला लावला आहे. हे दूध दहिगाव येथील शिवप्रसाद दूध संघास दिले जात आहे.या बचत गटाने चार लाख घेतलेले कर्ज अवघ्या आठ महिन्यांतच सर्व कर्जाची परतफेड केली असल्याचे मत यमाई बचत गटाच्या अध्यक्षा बेबीताई सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments