तुफानी पावसामुळे कित्येक झाडे उध्वस्त तर अनेक दुकाने भुईसपाट
"परतीच्या पावसाचा अकलूज मध्ये धुमाकूळ"
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे काल सायंकाळी परतीचा पाऊसाने, धुमाकूळ घातला असून,वादळी वा-यासह विजांच्या कडकडाटानेही मुसळधार पाऊसाला साथ दिली. या वादळी वाऱ्यामुळे, सदुभाऊ चौक, शिवशंकर बझार जवळील आणि डॉ.आंबेडकर चौक येथील एका किराणा दुकानावर झाड उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. मात्र दैव बलवत्तर कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दिपावलीनिमित्त बाजारपेठेत विविध वस्तूंची आणि पूजनाच्या साहित्यांची दुकाने थाटली होती पण अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह, पावसामुळे एकच गोंधळ उडाला.अनेकांच्या मालाचे पावसामुळे नुकसान झाले.त्यामुळे छोट्या व्यवसायीकांना दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.
*चौकट*
काल रात्री अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर मोठी झाडे रस्त्यावर पडली तर काही ठिकाणी खांबावरील तारा तुटल्या पडल्या होत्या.पण पाऊस थांबताच अकलूज नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे रस्त्यावर पडलेली झाडे लगेच बाजूला केली तर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काही क्षणातच विद्युत पुरवठा सुरळीत केला.त्यामुळे अकलूजच्या नागरिकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.
0 Comments