Hot Posts

6/recent/ticker-posts

विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात

 विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात


आ. संजय शिंदे यांची भूमिका
करमाळा (कटूसत्य वृत्त):- लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मी माझा व विरोधातला असा कधीही भेदभाव केला नाही. आलेल्या प्रत्येकाचे काम करण्यावर भर दिला आहे. यापुढेही विकासकामे करण्याचा प्रयत्न करणार असून याच मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी म्हटले आहे.
आ. शिंदे यांनी विधानसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर पोथरे येथे नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
आमदार शिंदे यांनी, या पंचवार्षिकमध्ये कुकडी प्रकल्पाचे पाणी बंद पाइपद्वारे मांगी तलावात सोडण्यात यावे म्हणून आमदार शिंदे यांनी पाठपुरावा केला. त्याच्या सर्व्हेचे आदेश प्राप्त झाले होते. कुकडी प्रकल्पावर अवलंबून असलेला मांगी तलाव पूर्ण क्षमतेने भरला पाहिजे आणि लाभक्षेत्रातील गावांना त्याचा फायदा झाला पाहिजे. यादृष्टीने प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेचे पाणी मांगी तलावत सोडणे आणि त्या माध्यमातून या भागाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.


Reactions

Post a Comment

0 Comments