शहर उत्तर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आत्मसंमान गहाण ठेवू देणार नाही
- सुदीपदादा चाकोते
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त 248 उत्तर विधानसभा सोलापूर मध्ये काँग्रेस च्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तातडीची बैठक यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या नेतृत्वात रविवारी घेण्यात आले. सुदीप चाकोते आपले प्रास्ताविक मध्ये म्हंटले मला उमेदवारी मिळाली नाही किंवा काँग्रेसला उत्तर विधानसभा चे जागा सुटले नाही म्हणून मी नाराज आहे परंतु नाराज होऊन बंडखोरी करणार नाही कारण चाकोते घराणा हा कधीच सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन आपले आत्मसन्मान घाण ठेवलेला नाही व पुढे देखील ठेवणार नाही. कार्यकर्त्यांचा माझ्यावर प्रचंड दबाव होता अपक्ष भरण्यासाठी परंतु आम्ही सर्वजण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा धर्मपालन करू.
248 उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक मनोगत व्यक्त केले, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शहर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या कडून झालेल्या कार्याची माहिती आम्हाला द्यावी. शहर उत्तर विधानसभा मधील बहुसंख्य बुथ हे रिकामे होते व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेले बुथ परत घेण्यात आले होते. प्रत्येक वेळी काँग्रेस पक्षानेच महाविकास आघाडीचा धर्म पाळायला हवे का? उत्तर विधानसभा मतदार संघासाठी अधिकृत झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपली उमेदवारी भरताना उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते की, जोपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी स्वतः होऊन माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे व सुदीप चाकोते यांना भेटून कार्यकर्त्यांना जबाबदारी देत नाहीत तोपर्यंत आम्ही उमेदवार साठी काम करणार नाही, अशा आक्रमक शब्दात आपले मनोगत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. प्रसंगी सुदीप दादा चाकोते विश्वनाथ अण्णा चाकोते गजानन घोडके, अशोक कलशेट्टी, संजय कुराडे, आनंद खटके, चेतनल , मुकुंद शिंदे, विणाताई देवकते, संघमित्रा चौधरी, भारती ईप्पलपल्ली, सुमन जाधव, हेमलता चिंचोळेकर, ए के क्षीरसागर, नागनाथ कदम, दत्ता आण्णा बंदपट्टे, मल्लिनाथ सोलापूरे, अप्पु शेख, विकी चाकोते. असलम नदाफ, मजा कोथिंबीर, अमीर नाटेकर, बाबरे, आलम नाडेवाले, शुकूर शेख, खंडू माळगे, बसवराज जाबा, सुरज घंटे, अमोल सुर्वे, गोविंद कांबळे,,सुमन जाधव, चंद्रकांत ठणकेदार, अंबादास गुत्तीकोंडा, खाजाबाई जगतार, अभिलाष अचूकटला, मोबीन कल्याणी, शहानवाज कंपली, बापू शिंदे, नागनाथ, प्रकाश नारायणकर, चंद्रकांत टिक्के, सोहेल मंद्रूपकर, सलमान कामतीकर, अशोक कोळी, मुरतोज काझी, लक्ष्मीकांत वन्नम, सिद्राम मंजेली, साई जाधव, लक्ष्मण मंजेली, प्रवीण बत्तुल, अजय मुदगल, निलेश गुंजाळ, बाबू धोत्रे, मोहसीन पिरजादे, आकाश भोसले, संतोष इरकल, सोमनाथ यमपुरे, अशोक यमपुरे, राजू कुक्केरी, भुजंग जाधव, विकी धोत्रे, अनिल विटकर, धीरज बंदपट्टे, शुभम धोत्रे, अमर मंजुळकर, राहुल धोत्रे,अजय जाधव,साई जाधव, गणेश मंठाळकर, नागेश मंठाळकर, शंकर चौगुले, सागर विटकर, राजू शिंदे. विनायक यमगल्ली, सुनील व्हटकर, शुकुर शेख उत्तर विधानसभा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.
0 Comments