Hot Posts

6/recent/ticker-posts

भाऊ तुमच्या चाळीचा बिटूचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत आमदार झाल्यावर प्राधान्याने मार्गी :- देवेंद्र कोठे

 भाऊ तुमच्या चाळीचा बिटूचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत आमदार

 झाल्यावर प्राधान्याने मार्गी  :- देवेंद्र कोठे 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुनी लक्ष्मी विष्णू चाळ येथे माझी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे व मंगलाताई कोल्हे यांच्यावतीने दिवाळीच्या अनुषंगाने चाळीतील कामगारांकरिता फराळ व फटाके वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास व्यासपीठावर शहर मध्यचे महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे , माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष जयश्री ताई पवार उपप्रमुख गवळी ताई , कामगार आघाडी प्रमुख सायबन्ना तेलोळी, भाजपचे सचिव शेखर फंड शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, वैद्यकीय अधिकारी बन्ने,शिंदे , शहर प्रमुख मागासवर्गीय माधुरी कांबळे , अर्जुन शिवसिंग वाले ,युवा सेना जिल्हा समनव्यक सोशल मीडिया प्रमुख नेहाल शिवसिंगवाले,महिबु सुबानी दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी अ.रहिमान खान , आबिद जहागीरदार ,गुलाम शेख ,सलीम पठाण ,जुबेर खान ,जावेद शेख ,आरिफ निगेबान , महिबुब मुजावर ,जब्बार कागदी उपस्थित होते.सुरुवातीला भाजपा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे व मंगला कोल्हे यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . चाळीतील कामगारांना फराळीचे वाटप आणि देवेंद्र कोठे यांनी चाळीतील कामगार ,चिमुकली मुले व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच यांच्यासमवेत फटाके उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.

           याप्रसंगी बोलताना महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले जुनी लक्ष्मी विष्णू चाळ येथील मुख्यत : प्रलंबित असलेला बिटूचा प्रश्न मार्गी लावू आपल्या आशीर्वादाने सोलापूरच्या प्रश्नाबाबत विधान भवनात आवाज उठविण्यासाठी एकदा संधी द्या नक्कीच संधीचे सोने करू असे प्रतिपादन केले.

        तर माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांनी त्यांच्या मनोगतात कोठे परिवार आणि आपले जुने वैयक्तिक घरगुती संबंध आहेत. देवेंद्र हे माझ्या घरातील प्रमुख सदस्य आहेत त्यामुळे मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारच आणि देवेंद्र कोठे आमदार नक्की होणारच असे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जवाहर जाजू यांनी केले.

      या कार्यक्रमास चाळीतील स्थानिक नागरिक जेष्ठ नागरिक युवक , बालगोपाळ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ...

Reactions

Post a Comment

0 Comments