अशोक लुणावत यांचे बँकिंग व व्यावसायिक क्षेत्रातील योगदान निश्चितच कौतुकास्पद-संचालक काशीद
मानेगाव (कटूसत्य वृत्त):- माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक लुणावत यांचे बँकिंग क्षेत्रातील ज्ञान, माहिती, कौशल्य व आधुनिक तंत्रज्ञान,नियोजन, व्यवस्थापन, बँकेचे अधिकारी व कर्मचारी हाताळण्याचे कौशल्य, कोणतेही कठीण काम सहजरित्या व प्रभावीपणे अमलात आणण्याची सचोटी आदी बाबींच्या जोरावर त्यांनी विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे. विशेषतः त्यांचे बँकिंग व व्यावसायिक क्षेत्रातील योगदान निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद यांनी केले.माढा येथे माढेश्वरी अर्बन बँक व माढेश्वरी मल्टीपल निधी आणि मित्रमंडळी यांच्या वतीने शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी अशोक लुणावत यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्काराच्या वेळी संचालक काशीद हे बोलत होते. प्रास्ताविकात बार्शी येथील माढेश्वरी अर्बन मल्टीपल निधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर मोरे यांनी चेअरमन अशोक
लुणावत यांच्या बँकिंग, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल माहिती सांगितली.
. सत्काराला उत्तर देताना चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की, खरे तर मी विविध प्रकारच्या
व्यावसायिक क्षेत्रात करिअर सुरू केले होते. परंतु त्यादरम्यान मला आ.बबनराव शिंदे यांनी माढेश्वरी बँकेत उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली. त्यामुळे मी बँकिंग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. या पदाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांद्वारे गोरगरीब व गरजूंची समाजसेवा करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या सुख-दुःखात कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व मित्रमंडळींची वेळोवेळी लाखमोलाची साथ मिळाली त्यामुळे मी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करू शकलो. असे त्यांनी सांगितले.यावेळी माढेश्वरी बँकेच्या संचालिका विपुला लुणावत, मंगल लुणावत, अभिजित लुणावत, सुधीर मोरे, नीलेश कुलकर्णी, राजेंद्र गुंड,धनंजय शहाणे, विशाल मेहता, राहुल शेटे, हिरालाल पोतदार, सुभाष शिंदे,दीपक कुलकर्णी, शिवाजी घाडगे,विक्रम पाटील, अक्षय कवटे,समाधान भांगे, केशव जाधव,राहुल घोगरे, संदीप सुळे, गणेश कारंडे, बळीराम मसलकर, सर्जेराव गडेकर, सिद्धेश्वर सावंत, सोमनाथ शिंदे, जयदीप ओहोळ, आदेश कदम,पंढरी गायकवाड, अविनाश लंकेश्वर,संतोष मोहिते, सागर पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 Comments