Hot Posts

6/recent/ticker-posts

आ. बबनदादा शिंदे यांनी आयोजित केलेल्या प्रचार दौऱ्यात मतदारांनी प्रचंड उपस्थिती दर्शविली

 आ. बबनदादा शिंदे यांनी आयोजित केलेल्या प्रचार दौऱ्यात मतदारांनी प्रचंड उपस्थिती दर्शविली



बेंबळे (कटूसत्य वृत्त):- येत्या २० नोव्हेंबर २४ रोजी होणाऱ्या माढा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने माढा विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या माळशिरस
तालुक्यातील १४ पैकी ११ गावातून आ. बबनदादा शिंदे यांनी आयोजित केलेल्या प्रचार
दौऱ्यात मतदारांनी प्रचंड उपस्थिती दर्शविली. त्यांनी खळवे, माळखांबी,विठ्ठलवाडी, वाफेगाव, वाघोली,
लवंग, मिरे, उंबरे (वे), कोंडारपट्टा,नेवरे व जांभूड या अकरा ठिकाणी प्रचारानिमित्त गावभेट दौरा आयोजित केला होता. प्रत्येक गावात आ.बबनदादा शिंदे यांचे वाद्याच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात येत होते. मौजे उंबरे (वे) येथे त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक व मोटरसायकल रॅली काढण्यात आली.आ. शिंदे यांनी मागील १५  वर्षात या चौदा गावांमध्ये दिलेला
कोटयवधी रुपये निधी व केलेल्या विकास कामांचा आढावा प्रत्येक ठिकाणी पदाधिकारी व गावकरी
सांगत होते. या निवडणुकीत अफवा पसरवत आहेत, तसेच अनेक लबाड्या करून खोटी आश्वासने
देत आहेत. परंतु त्यांच्या अशा धूर्त चलाख कावेबाज बोलण्याला व भूलथापांना मतदारांनी बळी पडू
नये, व या चौदा गावातून मागील पंधरा वर्षापासून केलेल्या विकास कामाच्या सत्य परिस्थितीवर विश्वास ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन गावोगावी स्थानिक पदाधिकारी व वक्ते आपल्या भाषणातून करत आहेत. या दौऱ्याप्रसंगी माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर, मौलासो पठाण,राहुल रेडे, रावसाहेब सावंत, हनुमंत चव्हाण, राहुल खटके, अमोल धोत्रे,सुनील राजमाने, नवनाथ पवार, राहुल टिक, बापू भोळे, शहाजी कदम,सुनील भोसले, दिलीप मिसाळ,सुदर्शन मिसाळ, दत्तात्रय पताळे,विष्णू चव्हाण, शब्बीर मुलाणी,विक्रम लाटे, सागर भोसले, संजय कदम, दादा लोकरे, मोहन लोकरे यांच्यासह गावोगावचे ग्रामपंचायत पदाधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments