Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथील महाविद्यालयात मतदान जनजागृती अभियान

 नातेपुते येथील महाविद्यालयात मतदान जनजागृती अभियान 



नातेपुते (कटूसत्य वृत्त) :- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी आपला हक्क बजवावा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक मतदारांनी इतरांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवण्याचे आव्हान महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी यांनी मतदान जनजागृतीच्या शपथेचे वाचन केले. कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक  जगदीशचंद्र मुळीक यांनी मतदान जनजागृती विषयी माहिती सांगून सर्वांचे आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments