Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कूल, मोहोळ येथे मतदान जनजागृती

श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कूल, मोहोळ येथे मतदान जनजागृती





मोहोळ  (कटूसत्य वृत्त):-
चला मतदान करूया ,लोकशाही रुजुवूया वृद्ध असो किंवा जवान ,अवश्य करा सर्वजण मतदान. अशा घोषणा देत श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल, मोहोळ मधील बाल चिमुकल्यांनी आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी शाळेमध्ये मतदान राष्ट्रीय कर्तव्य समजून जनजागृती केली आपला भारत देश एक लोकशाही प्रजासत्ताक आहे. जिथे लोक राज्य करतात. लोक त्यांच्या मताधिकार्‍याचा वापर करून अशा व्यक्तीची निवड करतात जो देशाच्या विकासासाठी सक्षम असेल आणि देशाचे सूत्रे कुशलतेने हाताळू शकेल. प्रत्येक व्यक्तीचे मत हे खूप मौल्यवान आहे. सरकार बनवण्यात देशातील प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची असते. असे प्रियांका अंकुश आणि रिया पवार या विद्यार्थिनींनी आपले मत मतदान जनजागृती उपक्रमादरम्यान व्यक्त केले.
अजितकुमार जाधव व सागर लाड यांना प्रशालेतर्फे निवडणूक उमेदवारी देण्यात आली. या मतदान उपक्रमांमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मतदानाचे प्रात्यक्षिक अनुभवण्यास मिळाले. हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले. संस्था सचिव आदरणीय सुनील झाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले . या उपक्रमाच्या शेवटी माझं मत माझा अधिकार आम्ही आमच्या मतदानाचा हक्क बजावला तुम्हीही तुमच्या मतदानाचा हक्क बजावा हा संदेश देऊन शंभर टक्के मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडली.

Reactions

Post a Comment

0 Comments