Hot Posts

6/recent/ticker-posts

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तनाची लाट

 शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तनाची लाट



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तनाची लाट असून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आणि माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्याबरोबरच समाजातील विविध घटकांतून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे विजय आणखी सुकर झाला आहे, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांनी व्यक्त केला. सोमवारी, प्रभाग ४ मधील परिसरात कोठे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली.वडार गल्ली येथून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली.ठिकठिकाणी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. पदयात्रेदरम्यान, कोठे बोलत होते.यंदाची निवडणूक ही नागरिकांनी हातात घेतली आहे.त्यामुळे यंदा परिवर्तनाची लाट आहे. मला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत असून बीआरएस आणि सुरेश पाटील उघडपणे माझा प्रचार करत आहेत. गेल्या २० वर्षांत काहीच कामे न केल्याने भाजप उमेदवाराकडे बोलायला मुद्देच नाहीत, असेही कोठे म्हणाले.पदयात्रेदरम्यान, महेश कोठे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार प्रेरणाभूमीला भेट देऊन अभिवादन प्रेरणाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. ही पदयात्रा वडार गल्ली,मिलिंद नगर, स्विपर्स कॉलनी, मुकुंद नगर, जम्मा चाळ, मराठा वस्ती, शिवगंगा मंदिर, बुधले गल्ली, महादेव गल्ली, वारद बोळमार्गे भडंगे गल्ली येथे पदयात्रेची सांगता झाली. या पदयात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments