दक्षिण सोलापूर सुजलाम् सुफलाम्
करण्यासाठी साथ द्या : काडादी
मंद्रूप (कटूसत्य वृत्त):- उजनी धरणाची निर्मिती होऊन अनेक वर्षे झाली तरी अजूनही धरणाचे पाणी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या टेलएंडपर्यंत पोहोचले नाही. ठरावीक भागातच कालवे झाले तेही वुजले गेले आहेत. सीना-भीमा नद्यांवर बॅरेजेस झाले नाहीत. भाजपचे लोकप्रतिनिधी दहा वर्षांपासून केवळ घोषणावाजी करून लोकांची दिशाभूल करीत आहेत.पाण्याअभावी दक्षिण सोलापूरचा हुतांश भाग कोरडवाहूच राहिला आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीचा विकास होणे गरजेचे आहे. तालुका सुजलाम सुफलाम आणि उद्योगवर्धिनी होण्यासाठी मतदारांनी आपल्याला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी केले. सोमवारी, धर्मराज काडादी यांची इंगळगी, वंकलगी आणि आहेरवाडीचा गावभेट दौरा करून तेथील मतदारांशी संपर्क साधला,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील व भीमाशंकर जमादार, सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील - कुडल, माजी जि. प. सदस्य अॅड. संजय गायकवाड, सिकंदरताज पाटील, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार कोळी, प्रा. डॉ.संतोष मेटकरी आदी उपस्थित होते.यावेळी काडादी म्हणाले,गेल्या दहा वर्षांत मतदारसंघातील ठोस कामे झाली नाहीत. गावोगावी चांगले रस्ते नाहीत,पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसेच विजेचा प्रश्न विकट झाला आहे. गावागावात आणि सोलापूर शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. देगाव एक्स्प्रेस कालवाही त्यांना पूर्ण करता आला नाही. कालव्याची कामे रखडली आहेत. उजनी धरणातून अतिरिक्त झालेले पाणी कर्नाटकला वाहून गेले. हे पाणी धुवधुवी प्रकल्पात सोडा, अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाने धुवधुवी प्रकल्प भरू दे म्हणून प्रार्थना करा,असे उपदेशाचे डोस पाजविले.जवावदारी झटकण्याचा प्रयत्न केला. आम्ही उपोषणकर्त्यांच्या पाठीशी राहिल्यानंतर ध्रुवधुवी प्रकल्पात पाणी आले. पुढच्या काळात या धुवधुवी प्रकल्पात कायम पाणी राहण्यासाठी तुम्ही मतदारांनी मला सेवेची संधी द्यावी, दरवर्षी सप्टेंबरमध्येच उजनीच्या पाण्याने धुवधुवी प्रकल्प भरेल, असे नियोजन करू,असेही काडादी यांनी मतदारांना आश्वासित केले.भाजपला शेतकऱ्यांबद्दल कोणतीही आस्था नाही. कांदा,सोयाबीन व इतर पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. आज महागाई प्रचंड वाढली आहे. बेरोजगार युवकांची संख्या वाढत आहे.त्यांना सोलापुरात आयटी पार्क आणता आले नाही. त्यामुळे येथील युवकांना पोटा पाण्यासाठी मोठ्या शहरात स्थलांतरित व्हावे
लागत आहे. सोलापूरपेक्षाही लहान शहरे असणारे विजयपूर आणि कलबुरगी या शहरांमध्ये
रिंगरोड झाले आहेत. त्यामुळे या शहरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. मात्र, सोलापुरात आजतागायत रिंग रोड होऊ शकले नाहीत, वाहतुकीची कोंडी होऊन याचा त्रास सर्वच
जनतेला होत आहे. आपले अपयश झाकण्यासाठी सुभाष देशमुख यांनी गावागावात भांडणे
लावली, असे काडादी यांनी सांगितले.
0 Comments