'कुरनूर' व 'उजनी'
स्वप्नच राहिले असते
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- कुरनूर धरणात उजनीचे पाणी आणणे ही माझी तालुक्यासाठी स्वप्नपूर्ती
होती. आता कुरनूर धरणातील पाणी तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविणे व तालुका हरित क्रांती
करून सुजलाम सुफलाम करणे हे माझे ध्येय आहे. ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि यावेळी
जनता मी केलेल्या कामाची जाणीव म्हणून माझ्या सोबत नक्की राहील आणि माझा विजय निश्चित आहे.
त्यावद्दल शंका वाळगण्याचे कारणच नाही, असे मत माजी आ.सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हेत्रे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक
मुद्दे स्पष्ट केले. अक्कलकोट मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून,सर्व जातीधर्मातून मिळणारा प्रतिसाद
पाहता मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट उसळलेली आहे आणि ही लाट विजयाकडे घेऊन जाणार आहे.
तालुक्यातील जनतेने मला १७ ते १८ वर्षे आमदारकी दिली पण केलेल्या कामाचा डंका मी एवढा
कधी पिटवला नाही. आता दरवेळी हे काम मीच केले, ते काम मीच केले अशा प्रकारचे काम विरोधक
मंडळी मतदारसंघात करत आहेत पण जनतेला चांगले माहिती आहे.आपण केलेल्या कामांची यादी खूप
मोठी आहे. तालुक्यात हरित क्रांती व्हावी म्हणून १९९६ पासून आम्ही उजनीच्या पाण्यासाठी झटत आहोत.
आता ते स्वप्न पूर्ण झाले आहे. स्वर्गीय आ.बाबासाहेब तानवडे यांच्या निधनानंतर या योजना रेंगाळतील असे वाटत होते पण जनतेने मला सातत्याने निवडून दिल्यामुळे या योजना पूर्ण होऊ शकल्या अन्यथा उजनीचे पाणी आणि कुरनूर धरण हे केवळ स्वप्नच राहिले असते. यासाठी सातत्याने आम्ही धडपड केली आणि या दोन्ही योजनांना सर्वाधिक निधी हा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातच मिळाला, हे सांगण्यासाठी कोण्या पंडिताची गरज नाही.पण विरोधक म्हणतात सर्व कामे मीच केली. ७० वर्षांचा अनुशेष अडीच वर्षांत भरून काढला, असा दावा करणे निव्वळ हास्यास्पद आहे. तालुक्याच्या प्रत्येक आमदारांनी काही ना काही योगदान दिले आहे.स्वर्गीय पार्वतीवाई मलगोंडा, स्वर्गीय आमदार वी. टी माने,इनायतली पटेल, महादेव पाटील आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील या सर्वांचे योगदान आहे.पण सर्व काम मीच केले असे मी कधीच म्हटले नाही. तालुक्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व जाती-धर्माला घेऊन तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. ही माझ्या दृष्टीने यावेळी जमेची बाजू आहे, असा विश्वास सिध्दाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केला.
0 Comments