'अक्कलकोट' ठरेल विकासाचे मॉडेल सचिन कल्याणशेट्टी यांचा विश्वास
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- पाच वर्षांपूर्वी मी निवडून आल्यानंतर तालुक्याची राजकीय संस्कृतीच वदलण्याचा प्रयत्न वऱ्यापैकी यशस्वी झाला आहे.अक्कलकोट तीर्थक्षेत्रासह अक्कलकोट हे एक मॉडेल विधानसभा क्षेत्र म्हणून वाटचाल करीत असल्याने पुन्हा एकदा जनता माझ्या वाजूने राहील याचा मला विश्वास आहे, असे मत आमदार सचिन
कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांनी आमदार कल्याण माध्यमांशी संवाद साधला. दुर्लक्ष अक्कलकोट तालुक्याकडे गेल्या ७० वर्षांत फार मोठे झाले होते. गेल्या ७० वर्षांत जी विकासकामे मार्गी लागली नाहीत ती विकासकामे अडीच वर्षांत मार्गी लागली आहेत. सुमारे अडीच हजार कोटींची विकासकामे प्रगतिपथावर आहेत. येत्या अडीच वर्षांत अक्कलकोटचे चित्र मोठ्या प्रमाणात पालटलेले दिसेल. या जोरावर अक्कलकोटची जनता पुन्हा एकदा विकासकामाची पोच
म्हणून भाजपलाच मोठ्या प्रमाणात विजयी करणार आहे. महाराष्ट्रातही पुनश्च भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात अडीच हजार कोटींच्या विकासकामांना महायुती सरकारच्या काळात मंजुरी मिळाल्याचा पुनरुच्चार कल्याणशेट्टी यांनी केला. ३६५ कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह ग्रामीण रुग्णालय, नवीन वसस्थानक निर्मिती, मल्लिकार्जुन मंदिर जीर्णोध्दार, न्यायालय नवीन इमारत अशी अनेक कामे सांगता येतील. मैंदर्गी, दुधनी नगरपालिका पाणीपुरवठा योजनेसह मोठ्या प्रमाणात रस्ते विकास, पूल बांधणीकरिता मंजुरी मिळाली आहे. अनेक कामेप्रगतिपथावर आहेत.तालुक्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणारे एकरुख उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतासह मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचे काम महायुती शासनाने केले. यामुळे उजनीचे पाणी कुरनूर धरणात पोहोचले. अनेक राष्ट्रीय महामार्ग मंजुरीमुळे तालुक्यात दळण-वळणाचे मोठे जाळे निर्माण झाले. आमच्याकडे विकासाचे व्हिजन आहे म्हणून जनता गेल्या वेळी निवडून दिली आहे. यावेळी सुद्धा तेच होणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी फेक नरेटिव्ह सेटकरण्यात आला होता. निवडणुकीत भाजपलाच मोठ्या मताधिक्याने जनता पुनश्च निवडून देणार असल्याचा ठाम विश्वास आमदार सचिन कत्याणशेट्टी यांनीयावेळी वोलताना व्यक्त केला.
0 Comments