देवेंद्र कोठे या तडफदार नेतृत्वाची तरूणांमध्ये क्रेझ : महास्वामी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 12, 2024

देवेंद्र कोठे या तडफदार नेतृत्वाची तरूणांमध्ये क्रेझ : महास्वामी

 देवेंद्र कोठे या तडफदार नेतृत्वाची तरूणांमध्ये क्रेझ : महास्वामी



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे हे उच्चशिक्षित आणि तडफदार नेते असल्याने त्यांची तरूणांमध्ये क्रेझ आहे. शहर मध्य' च्या विकासासाठी नागरिकांनी ठरवल्याप्रमाणे यंदा महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केला.कोठे यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक १८ मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी बोलत होते. यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम,माजी सभागृहनेते आणि शहर मध्य विधानसभेचे समन्वयक शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.नागेंद्रनगर देवी मंदिर येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा यशवंत सोसायटी, श्रीराम नगर, पाटील नगर, शारदा विडी कारखाना,वेंकटेश्वर नगर, माधव नगर, तिमप्पा बंडा शाळा, माधव नगर हनुमान मंदिर, इंदिरानगर, ज्योती तरुण मंडळ, सत्तर फूट रस्ता चौक, महादेव मंदिर, शरण लिंगेश्वर मठ, सजन मित्र मंडळ, गेंट्याल टॉकीज,सत्यसाई नगरमार्गे लोकसेवा शाळेजवळ विसर्जित झाली.याप्रसंगी श्रीनिवास करली, शहर चिटणीस सुनील गौडगाव, मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, धीरज कुंभार, शहर चिटणीस बजरंग कुलकर्णी, नगरसेवक सुनील पाताळे, उपाध्यक्ष जय साळुंखे,जक्कप्पा कांबळे, पुरुषोत्तम पोबत्ती आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages