स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुला मुलींसाठी गाव तिथे वाचनालय ही संकल्पना राबू- अॅड. मीनल साठे
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा मतदारसंघात शिक्षण व आरोग्य सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचवून त्या भक्कम करण्यावर भर देणार तसेच या मतदारसंघातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुला मुलींसाठी गाव तिथे वाचनालय ही संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना यानिमित्ताने प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार अॅड. मीनल साठे यांनी वाडीकुरोली येथील सभेत बोलताना दिली.माढा विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार मीनल साठे यांनी रविवारी प्रचार दौऱ्यानिमित्त देवडे पिराजी कुरोली, वाडीकुरोली, बार्डी सांगवी, उंबरे, कान्हापुरी या गावावत कॉर्नर सभा घेतल्या. वाडीकुरोली येथील जाहीर सभेत बोलताना साठे यांनी सांगितले की, या मतदारसंघात मतदारांनीमला विधानसभेत काम करण्याची संधी दिल्यास य शिक्षण व आरोग्य सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचवून त्या भक्कम करण्यावर भर देणार आहे. तसेच महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी छोटे-मोठे लघुउद्योग गृहउद्योग उभारले जातील.या प्रचार दौऱ्यानिमित्त फिरत असताना महिला उमेदवार म्हणून व महायुती सरकारच्या लाडकी बहिणी योजनेमुळे गावात प्रत्यक्ष होम टू होम प्रचार केला असता महिला उत्स्फूर्त पाठिंबा देत असल्याचे दिसून आले. यावेळी सरपंच सुनीता काळे, योगेश काळे,विजय पाटील, विकास पाटील,सुभाष कुंभार, नंदू पाटील, सुरेश काळे, जनाबाई चव्हाण उपस्थित होते. देवडे येथील गावभेट प्रचार दौऱ्यावेळी उपसरपंच गणेश शिंदे रामेश्वर झांबरे, दादा शिंदे,बापू शिंदे, विलास पाटील, स्वाती झांबरे पांडुरंग झांबरे उपस्थित होते.
0 Comments