दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी प्रचारात आघाडी घेतली
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारादरम्यान शहरी तसेच ग्रामीण भागातील म तदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळवणारा नेता म्हणून वैद्य यांची ओळख निर्माण होत आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सोमनाथ वैद्य हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. आतापर्यंत त्यांनी मतदारसंघातील ग्रामीण भाग दक्षिण सोलापूर विधानसभा पिंजून काढला आहे. निवडणुका मतदारसंघातील शहरी भागात विविध कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली यामुळे त्यांचा शहरी भागातील मतदारांचा ही परिचय झालेला आहे. त्यांच्या कामातून त्यांनी त्यांची प्रतिमा निर्माण केली असल्यानेच मतदारांचा त्यांच्याकडे ओढा वाढताना दिसत आहे.
रविवार १० रोजी वैद्य यांनी सलगरवस्ती, पारधी वस्तीसह परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेत त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेमध्ये अर्जुन जाधव, लक्ष्मी जाधव, सचिन गायकवाड, मारुती गडाख, मच्छिंद्र क्षीरसागर, राजश्री कांबळे, दत्ता पवार, सदा नाईकवाडी, अशोक म सरे, सागर आपटे, संजय नकाते आदी सहभागी झाले होते..
जनतेने मला निवडून दिल्यास जनतेचा आमदार म्हणून मी काम करेन असे आश्वासन वैद्य यांनी यावेळी मतदारांना दिले. गेल्या दोन महिन्यापासून या म तदारसंघातील मतदारांच्या मी संपर्कात असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली असल्याचे वैद्य म्हणाले.
विद्यमान आमदारांनी अनेक आश्वासने दिली. परंतु त्याची पूर्तता करण्यात ही कमी पडले. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यानेच जनता यावेळी त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास वैद्य यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान मंत्रालयात असलेला माझा संपर्क हा जनतेच्या कामासाठी उपयोगी पडणार आहे. त्याचमाध्यमातून मी जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असून दक्षिण विधानसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याकडे माझा कल असणार असल्याचे वैदे यांनी सांगितले. दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या योजना आणून त्या माध्यमातून येथील जनतेचा विकास साधणार आहे. शेती बरोबरच औद्योगिक विकासालाही चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल व इतर जिल्ह्यात जाणारा तरुणांचा लोंढा थांबेल असे वैद्य यांनी यावेळी स्पष्ट केले.
0 Comments