माढा मतदारसंघातील रस्त्यांचा विकास कागदावरच
अॅड. मीनल साठे यांची टीका
माढा, ( कटूसत्य वृत्त ):-
माढा विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील गेल्या पंधरा वर्षांपासून ही ४२ गावे जोडलेली आहेत. या भागातील रस्त्यांचा प्रश्न कायम आहे. यासाठी वेळोवेळी निधी मंजूर केला जातो परंतु रस्त्याचे काम सत्ताधाऱ्यांच्या= नातेवाईक ठेकेदाराला दिले जाते व रस्त्याची परिस्थिती पूर्वीसारखी लगेच झालेली दिसून येते अशी टीका मीनल साठे यांनी केली.
माढा विधानसभा मतदारसंघातील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड. मीनल साठे यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील ४२ गावातील पांढरेवाडी, चिलाईवाडी, आजोती, जाधववाडी येथे जाहीर सभा झाल्या. यावेळी महिला व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. पांढरेवाडी या ठिकाणी जाहीर सभेत बोलताना मीनल साठे यांनी सांगितले की, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून माढा तालुक्यातील महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, लघुउद्योग प्रशिक्षण, फूड प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण, बचत गटातील महिलांसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण या मंडळाच्या माध्यमातून दिले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाते. भविष्यात या मतदारसंघातील महिलाना, मुलींसाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी मंडळामार्फत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार असल्याचे आश्वासन
दिले. तसेच महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना, महिलांना अर्ध्या तिकीट प्रवास तसेच शासनाच्या अनेक योजना विषयी माहिती दिली. मीनल साठे यांचा माढा संपूर्ण मतदारसंघांमध्ये होम टू होम प्रचार प्रभावी होताना दिसत आहे.
यावेळी बापूसाहेब फाळके, दगडू पवार, शिवाजी लोहार, रुपाली फाळके, रियाज मुलाणी, विष्णू फाळके, सोनवा आयरे, बापूसाहेब फाळके, जाधववाडी येथे दत्तात्रय शेळके, प्रदीप हजारे, सोमनाथ शेळके, चिलाईवाडी येथे काकासाहेब शेळके, अण्णा शेळके, भारत जमदाडे, प्रदीप सलगर, प्रल्हाद गायकवाड, अजोती येथे राजू आरकीले, सुभाष साळुंखे, प्रशांत गुटाळ आदी उपस्थित होते..
0 Comments